Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोदी कामगारांच्या वेतन करारावर 30 ऑगस्टला होणार सह्या

गोदी कामगारांच्या वेतन करारावर 30 ऑगस्टला होणार सह्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:14 PM2018-08-28T20:14:59+5:302018-08-28T20:16:10+5:30

Dock workers will be able to pay salaries on August 30 | गोदी कामगारांच्या वेतन करारावर 30 ऑगस्टला होणार सह्या

गोदी कामगारांच्या वेतन करारावर 30 ऑगस्टला होणार सह्या

मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांसाठी 1 जानेवारी 2017 पासून वेतन करार लागू झाला आहे. या करारावर केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10. 30 वा. मुंबई येथे सह्या होणार आहेत, असे आज झालेल्या द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीमध्ये इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटीया यांनी जाहीर केले. 
गोदी कामगारांच्या वेतन कराराबाबत 4 जुलै 2018 रोजी दिल्लीत पगारवाढीचा समझोता झाला होता.  त्यानुसार गोदी कामगारांचा करार  पाच वर्षांचा होणार असून 10. 6 टक्के वाढ मिळणार आहे.  घरभाडेभत्ता पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. आज झालेल्या  द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीला गोदी कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये, मोहमद पी. हनिफ, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, केरशी पारेख, सामंतराय, प्रभाकर उपरकर, नरेन्द्र राव आदी उपस्थित होते. 

Web Title: Dock workers will be able to pay salaries on August 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.