Join us  

महागाईमुळे रिटर्नवर परिणाम होतो का? पाहा, बाजारांची कामगिरी, ‘या’मध्ये करा गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 8:57 AM

महागाईमुळे आपल्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर किती परिणाम होतो हे जाणून घेऊया...

लोकमत न्यूज नेटवर्क : भारतासह जगभरात महागाई उच्चांकी पातळीवर आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन आणि अन्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. महागाईमुळे आपल्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर किती परिणाम होतो हे जाणून घेऊया...

शेअर बाजार का वाढतोय?

- महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका व्याजदरात वाढ करीत आहेत. याचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसत आहे. शेअर बाजारातही परिणाम दिसून येत आहे. 

- आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, वाढत्या व्याजदरांमुळे शेअर बाजारांत अस्थिरता निर्माण होते. मात्र, त्यानंतर समभागांची कामगिरी मजबूत होताना दिसून येते.

पोर्टफोलिओमध्ये आणा वैविध्य

चांगल्या परताव्यासाठी आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदार स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड यापैकी एकातच सगळा पैसा लावतात. त्यामुळे जोखीम मोठ्या प्रमाणातवाढते. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे जोखीम कमी होते. त्याबरोबरच दीर्घ कालावधीत आपला परतावाही वाढतो.

यापासून वाचा...

- भविष्यात येणाऱ्या वादळांचा अंदाज घेण्याचे टाळा. घसरणीमध्ये गुंतवणुकीच्या संधीचा वापर करा.

- समाजमाध्यमांवर येणारे सल्ले स्वीकारणे टाळा. 

- गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी मदत घ्या. पुढे काही होईल याची अटकळ बांधू नका. पोर्टफोलिओची समीक्षा करा

यामध्ये करा गुंतवणूक

गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, फिक्स्ड इनकम, गृहनिर्माण प्रकल्प, सोने आणि इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना योग्य समतोल साधावा.

महागाईच्या काळातील बाजारांची कामगिरीअवधी    रेपो रेट         निफ्टी परतावासप्टेंबर २००४-ऑक्टोबर २००८    ६%    ९.०%    ११४%ऑक्टोबर २००८-फेब्रुवारी २०१०    ९%    ४.७५%    ३९%फेब्रुवारी २०१०-मार्च २०१२    ४.७५%    ८.५०%    १४%मार्च २०१२-सप्टेंबर २०१३    ८.५०%    ७.२५%    १५%सप्टेंबर २०१३-मार्च २०१५    ७.२५%    ८.०%    ४३%मार्च २०१५-जून २०१८    ८.०%    ६.०%    ३१%जून २०१८-जुलै २०१९    ६.०%    ६.५%    ४.५%जुलै २०१९-एप्रिल २०२२    ६.५%    ४.०%    ६७%एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत    ४.०%    ४.९%    -११%

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकमहागाई