लोकमत न्यूज नेटवर्क : वाढत्या महागाईच्या काळात चांगल्या परताव्याची हमी देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास पोस्टाची नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इन्कम स्कीम चांगली आहे. या योजनेत पैसे सुरक्षित राहतात. तसेच ६.६ टक्के वार्षिक व्याजही मिळते.खाते उघडण्यासाठी किती रुपयांची गुंतवणूक करावी?पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इन्कम स्कीममध्ये १ हजार रुपये गुंतवून खाते उघडता येते.सिंगल अकाऊंट असेल तर साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.जॉइंट अकाऊंट असल्यास बचत नऊ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते.परताव्याचे काय?या योजनेवर दरसाल दरशेकडा ६.६ टक्के व्याज दिले जात आहे.वार्षिक ६.६ टक्के व्याजाला १२ महिन्यांनी भागले जाते व ती रक्कम दरमहा गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.खात्यातून दरमहा पैसे न काढल्यास ती पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहील आणि मूळ रकमेबरोबर त्यावर पुढे व्याज दिले जाईल.म्हणजेच साडेचार लाखांच्या गुंतवणुकीवर २४७५ रुपये दरमहा व्याज मिळेल.मॅच्युरिटीचा कालावधी किती?या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा असतो.पाच वर्षांनंतर गुंतवणूकदार पैसे काढू शकतात किंवा पुन्हा गुंतवू शकतात.पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतात.मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढता येतील?मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढायची गरज भासल्यास वर्षभरानंतर रक्कम काढता येते.अकाऊंट १ ते ३ वर्षे सक्रिय असेल तर त्यात जमा झालेल्या रकमेतून २ टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम गुंतवणूकदारास परत केली जाते.३ वर्षांनंतर योजनेतून माघार घेतल्यास १ टक्का रक्कम कापली जाते.१८ वर्षे वयावरील कोणीही भारतीय नागरिक या योजनेचा सदस्य होऊ शकतो.
पोस्टातली बचत, उत्तम पर्याय आहे का? परतावा किती? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 5:51 AM