Lokmat Money > बिझनेस न्यूज > सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या

सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या

Job News: पगारात मनाजोगी वाढ होत नसेल तर कर्मचारी हातातील नोकरी करीत-करीत दुसऱ्या जादा पगाराची नोकरी शोधत असतात. संधी मिळाली की नव्या ठिकाणी जॉईन करतात. हा सिलसिला पुढे सुरूच राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:44 PM2024-09-02T14:44:05+5:302024-09-02T14:45:33+5:30

Job News: पगारात मनाजोगी वाढ होत नसेल तर कर्मचारी हातातील नोकरी करीत-करीत दुसऱ्या जादा पगाराची नोकरी शोधत असतात. संधी मिळाली की नव्या ठिकाणी जॉईन करतात. हा सिलसिला पुढे सुरूच राहतो.

Does the habit of constantly changing jobs benefit or harm you? find out | सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या

सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या

 नवी दिल्ली -  पगारात मनाजोगी वाढ होत नसेल तर कर्मचारी हातातील नोकरी करीत-करीत दुसऱ्या जादा पगाराची नोकरी शोधत असतात. संधी मिळाली की नव्या ठिकाणी जॉईन करतात. हा सिलसिला पुढे सुरूच राहतो. पण यामुळे तात्पुरता फायदा होत असला तरी तुमचा तोटा होत असतो, हे अधोरेखित करणारा अहवाल समोर आला आहे. लिंक्डइन पोर्टलद्वारे ही पाहणी करण्यात आली. 

या पाहणीसाठी देशभरातील १,०२४ हायरिंग मॅनेजर्सची मते जाणून घेण्यात आली आहेत. एखाद्या व्यक्तीला नोकरी देत असताना नेमके कोणते निकष लावले जात असतात, कंपन्यांचे व्यवस्थापन आपल्या गरजांना किती प्राधान्य देत असते याबाबत त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. 

फिल्ड का बदलले, हे नेमकेपणाने सांगा 
- उमेदवारांच्या बायोडाटामध्ये अनेक नोकऱ्यांची माहिती असते.  पहिली नोकरी निवडलेल्या फिल्डमध्ये मिळतेच असे नाही. पुढे आवडीनिवडी किंवा तत्कालीन गरजेनुसार फिल्ड बदलले जात असते.
- दोन नोकऱ्यांमधील कालावधी कमी का, कोणत्या कारणामुळे फिल्ड बदलले, यामागे काही अपरिहार्य कारणे होती का, याचे पटण्याजोगे उत्तर उमेदवारांना देता आले पाहिजे. त्यावेळची स्थिती सांगता आली पाहिजे. 
- अनेक नोकऱ्या बदलल्याने कोणती नवी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी तुम्हाला मिळाली याची माहिती आत्मविश्वासाने देता आली पाहिजे, तर तुमचा नक्की विचार केला जाऊ शकतो, असे मॅकस्किल यांनी सांगितले.

५४% - मॅनेजर्सनी नवी कौशल्ये शिकण्याची तयारी असलेल्यांना प्राधान्य दिले.  
४८% - जणांनी तत्काळ रुजू होण्याची तयारी असलेल्यांना संधी दिली. 
४०% -मॅनेजर्सनी फुलटाइम नोकरी करणाऱ्यांना निवडीमध्ये प्राधान्य दिले. 
३७% - जण म्हणाले की वारंवार नोकऱ्या बदलणाऱ्यांचे बायोडाटा वगळले.  
३४% - जणांनी  आधीच्या नोकऱ्यांवरून करिअरचे प्रोफाइल तपासले.   

Web Title: Does the habit of constantly changing jobs benefit or harm you? find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.