कोलकाता : डॉलर इंडस्ट्री लिमिडेट या होजिअरी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या उलाढालीत २०१६-१७ या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात असणाऱ्या ८३० कोटींच्या उलाढालीने यंदा थेट ९०६ कोटींचा टप्पा गाठला आहे.
कंपनीचा कर भरणापश्चात नफासुद्धा (पीएटी) ६४. ९५ टक्क्यांनी वाढून ४३.४६ कोटींवर पोहोचला आहे. या वृद्धीला
आणखी बळ देण्यासाठी कंपनी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये उद्योग विस्ताराचे प्रयत्न करीत आहे. २०२० पर्यंत विक्री साखळीच्या माध्यमातून या शहरांत पाय रोवण्याचा कंपनीचा मानस आहे.
देशा-परदेशातील स्थान कायम राखण्यासोबतच नव्या बाजारपेठाही पादाक्रांत करू शकलो. लवकरच आणखी मोठी बाजारपेठ काबिज करू, असे ‘डॉलर’चे व्यवस्थापकीय संचालक विनोद गुप्ता यांनी सांगितले.
डॉलर’च्या उलाढालीने गाठला ९०६ कोटींचा टप्पा!
डॉलर इंडस्ट्री लिमिडेट या होजिअरी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या उलाढालीत २०१६-१७ या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे
By admin | Published: June 1, 2017 03:08 AM2017-06-01T03:08:54+5:302017-06-01T03:08:54+5:30