नवी दिल्ली : सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. गॅस कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किमतीत वाढ केली असून, आता सिलिंडर घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो)दरात 76.5 रुपयांची वाढ केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता 681.50 रुपये प्रतिसिलिंडर द्यावे लागणार आहेत, तर मुंबईत गॅसची किंमत 651 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 605 रुपये होती.
व्यावसायिक गॅस सिलिंडर (19 किलो)च्या दरातही 119 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत दुकानदारांना आता व्यावसायिक सिलिंडरसाठी तब्बल 1204 रुपये मोजावे लागणार आहेत. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1085 रुपये होते. तर पाच किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतही 264.50 रुपयांनी वाढ झाली आहे. हे वाढलेले दर शुक्रवारी 1 नोव्हेंबरपासून लागू होतील.
1 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडलं होतं. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला होता. नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागत होते. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागत होते. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले होते. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली होती. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये होती.
सप्टेंबरमध्येही वाढले गॅस सिलिंडरचे दर
सप्टेंबरमध्ये दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडर 590 रुपये होता. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 616.50 रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडरचा दर क्रमशः 562 आणि 606.50 रुपये होता. तसेच 19 किलोग्रामच्या दिल्लीतल्या सिलिंडरची किंमत 1054.50 रुपये होती. कोलकात्यात गेल्या महिन्यात 1114.50 रुपये, मुंबईत 1008.50 रुपये आणि चेन्नईत 1174.50 रुपये दर होता.
सर्वसामान्यांना मोठा धक्का, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ
सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:15 AM2019-11-01T09:15:44+5:302019-11-01T09:23:40+5:30