Join us

इन्फ्लुएन्सर्सना बळी पडू नका, टाटा मेमेरियलच्या संचालकांचा Zerodhaच्या मालकाला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 3:31 PM

काही दिवसांपूर्वी झिरोदाचे संस्थापक नितीन कामथ यांना माईल्ड स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. पण का दिला टाटाच्या डॉक्टरांनी त्यांना हा सल्ला, जाणून घ्या.

काही दिवसांपूर्वी झिरोदाचे संस्थापक नितीन कामथ यांना माईल्ड स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून त्यांनी याची माहिती दिली होती. दरम्यान, यातून सावरत असलेल्या नितीन कामथ यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईचे संचालक डॉ. सीएस प्रमेश यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय. त्यांनी नितीन कामथ यांच्यासह सोशल मीडियाशी संबंधित लोकांना 'रँडम इन्फ्लुएन्सर्सच्या' सल्ल्याकडे लक्ष न देण्यास सांगितलं. स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आणि ट्रेडिंग ॲप झिरोदाचे नितीन कामथ यांनी सोमवारी त्यांच्या माईल्ड स्ट्रोकबद्दल माहिती दिली होती. यानंतर नितीन कामथ यांना सोशल मीडियावरील एका इन्फ्लुएन्सरनं स्ट्रोक बाबात काही सल्ला दिला होता. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर त्यांनी एका इन्फ्लुएन्सरचा सल्ला रिपोस्ट केला. सोशल मीडिया आपल्या जीवनासाठी किती धोकादायक असतं हे ते दाखवून देत आहे. कृपया रँडम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या म्हणण्याला फॉलो करू नका. अशा लोकांकडे आपले तर्क योग्य आहेत हे दाखवण्यासाठी 'माझ्यावर विश्वास ठेवा', 'भाई' असे शब्द असतात. परंतु ते विज्ञान नाही, असं डॉ. प्रमेश म्हणाले. 

हेही वाचा - Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath यांना स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? म्हणाले, "मला आश्चर्य..." 

त्यांनी आणखी एका सोशल मीडिया पोस्टवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. "याचं समर्थन करण्यासाठी कोणतेही योग्य विज्ञान नाही. कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेल्या इन्फ्लुएन्सर्सना बळी पडू नका, असं ते म्हणाले. सामान्यता जे लोक सल्ला देतात त्यांचा हेतू चांगला असू शकतो. परंतु कोणत्याही माहिती किंवा संशोधनाशिवाय सल्ला देणं धोकादायक असू शकतं. अशा परिस्थितीत सावध राहा, असंही त्यांनी नमूद केलंय. 

काय झालंय नितीन कामथ यांना? 

दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) फाऊंडर नितीन कामथ यांना सहा आठड्यांपूर्वी माईल्ड स्ट्रोक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याची अनेक कारणं असू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. नितीन कामथ यांनी आपल्या या कठीण काळाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे माहिती दिली होती. वडिलांचं निधन, चांगली झोप न घेणं, कमी पाणी पिणं, थकवा आणि कामाचा प्रचंड ताण हे यामागचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पूर्णपणे बरं होण्यासाठी आपल्याला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो असंही ते म्हणाले.

टॅग्स :नितीन कामथटाटा