प्रवासादरम्यान अनेक वेळा महामार्गावर किंवा रस्त्यावर वाहनं खराब झाल्याची समस्या उद्भवते. निर्जन रस्त्यावर किंवा हायवेवर गाडी बिघडली तर अनेकदा आपण पॅनिकही होतो. पण जर तुमच्या खिशात क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे तुमचं क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. क्रेडिट कार्ड तुम्हाला यातून बाहेर काढू शकतं.
खरं तर आता काही क्रेडिट कार्ड्स तुम्हाला रोडसाईड असिस्टंसची सुविधा देतात. या क्रेडिट कार्ड फीचर्सचा वापर करून, तुम्ही हायवेवर खराब झालेल्या वाहनासाठी मदत मिळवू शकता. रोडसाईड असिस्टंस फीचरमध्ये टोइंग, बॅटरी जंपस्टार्ट, टायर बदलणं, फ्युअल डिलिव्हरी सारख्या सुविधा मिळतात. तुम्हाला जवळच्या शहरात नेण्यासाठी बॅकअप वाहनाची सुविधा देखील मिळू शकते. आता जाणून घेऊ या फीचरबाबत.
असा करा वापरजर तुमच्या क्रेडिट कार्डात रोड साईड असिस्टंस हे फीचर असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला पहिले क्रेडिट कार्डाच्या डेडिकेटेड हेल्पलाईन नंबरवर फोन करावा लागेल. यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्डाची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. हेल्पलाईन नंबरला फोन केल्यानंतर तुम्हाला मदत मिळेल.
मिळणार या सुविधाक्रेडिट कार्डमध्ये रोडसाईड असिस्टंस फीचर असल्यास तुम्हाला टायर चेंज, बॅटरी जम्पस्टार्ट, टोईंग, फ्युअल डिलिव्हरी या सेवांचा समावेश आहे. ही फीचर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. जर तुमची कार सुरू होत नसेल तर तुम्ही टोईंग सेवेसाठी फोन करू शकता. जर तुम्ही क्रेडिट कार्डाद्वारे रोडसाईड असिस्टंसचा लाभ घेतला तर तुमचे खूप पैसे वाचू शकतात. परंतु ही सुविधा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही रोडसाईड असिस्टंसची मेंबरशीप घेतलेली असेल.