बंगळुरू : भारतातील आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या नोकर कपातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच जबाबदार असल्याचे आयटी व्यावसायिक मानत आहेत. ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण कडक केल्यामुळेच भारतीय आयटी व्यावसायिकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत, असा सूर आयटी क्षेत्रातून ऐकायला मिळत आहे.
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीत नोकरी करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेला कंपनीने अचानक राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांच्यासारख्या अनेकांना
हा निरोप मिळाला आहे.
राजीनामा देणार नाही, तुम्ही
मला कामावरून काढून टाका,
अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कंपनीने त्यांना काढल्यास
त्या न्यायालयात दाद मागू शकतात. लोकांना अशा प्रकारे
नोकरीवरून काढण्याचा प्रकार आमच्या उद्योगात नव्हता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या
धोरणांमुळे आम्हाला नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
कॉग्निझंट, इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या बहुतांश मोठ्या कंपन्यांनी नोकर कपात हाती घेतली आहे. तथापि, किती लोकांना कामावरून काढणार याची आकडेवारी कंपन्यांनी जाहीर केलेली नाही. आयटी उद्योगाच्या तीस वर्षांपेक्षा जास्त इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात झाली नव्हती.
सूत्रांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या धोरणांचा परिणाम म्हणून सॉफ्टवेअर कंपन्या अमेरिकेतील प्रकल्पांसाठी अमेरिकी नागरिकांची भरती करू लागल्या आहेत.
१0 हजार अमेरिकींची भरती करण्याचा निर्णय इन्फोसिसने अलीकडेच जाहीर केला आहे.
ट्रम्प यांना दोष देणाऱ्यांची या उद्योगात काम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या बहुतांश आयटी हब असलेल्या शहरांतील नोकरी गमावणाऱ्या हजारो इंजिनीअरांचे हेच मत आहे. समाज माध्यमांतून ते आपली मते मांडत आहेत. कॉग्निझंटच्या कोलकाता युनिटमधून हकालपट्टी झालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, लोक चिडले आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांचाच हा परिणाम आहे, असे त्यांना वाटते.
आयटी कंपन्या मात्र सामूहिक नोकरकपातीचे वृत्त मान्य करायला तयार नाहीत. नास्कॉमने अलीकडेच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली होती. सर्व मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी तेथे हजर होते. संघटनेचे चेअरमन रमण रॉय यांनी सांगितले की, आम्ही १,७0,000 नव्या नोकऱ्या दिल्या आहेत. सामूहिक नोकरकपातीचे वृत्त खरे नाही.
आयटीतील नोकरकपातीला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार
भारतातील आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या नोकर कपातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच
By admin | Published: May 25, 2017 01:06 AM2017-05-25T01:06:37+5:302017-05-25T01:06:37+5:30