Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?

आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसंही उत्तर द्यायचीही तयारी सुरू केलीये. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औषध असं संबोधलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:41 IST2025-04-08T16:33:35+5:302025-04-08T16:41:58+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसंही उत्तर द्यायचीही तयारी सुरू केलीये. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औषध असं संबोधलंय.

donald Trump tariffs affected stock world junk bond sales in full swing in America heading towards recession | आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?

आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर (Tariff War) संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसंही उत्तर द्यायचीही तयारी सुरू केलीये. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औषध असं संबोधलंय. असं असलं तरी याचा फटका अमेरिकेलाही मोठ्या प्रमाणात बसताना दिसून येतोय. दुसरीकडे जगभरात मंदीचंही सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गननंही जगात मंदी येण्याची ६० टक्के शक्यता असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे २०२० नंतर अमेरिकेच्या जंक बाँड मार्केटमध्ये सर्वात मोठी विक्री झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढत्या चिंतेचे संकेत मिळत आहेत.

आयसीई बोफाच्या आकडेवारीनुसार, डिफॉल्ट जोखमीसाठी प्रॉक्सी असलेल्या अमेरिकन सरकारी रोख्यांच्या तुलनेत स्पेक्युलेटिव्ह रेटेड कॉर्पोरेट डेट ठेवण्याची प्रीमियम गुंतवणूकदारांची मागणी बुधवारपासून १ टक्क्यांनी वाढून ४.४५ टक्के झाली आहे. २०२० मध्ये कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर व्यापक लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.

जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी

ट्रम्प यांनी अमेरिकेचे शुल्क शतकातील उच्चांकी पातळीवर नेलं तेव्हापासून कॉर्पोरेट रोख्यांमधील विक्रीमुळे गुंतवणूकदारांची चिंता अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे आर्थिक उत्पादनावर परिणाम होईल आणि बेरोजगारी वाढेल, तसंच कमकुवत कंपन्यांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असं विश्लेषकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी जेपी मॉर्गननं अमेरिकेच्या आर्थिक अंदाजात कपात केली आणि २०२५ मध्ये ०.३ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला. बेरोजगारीचा दर मार्चमधील ४.२ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांवर जाईल, असंही अहवालात म्हटलंय.

जंक बाँड म्हणजे काय?

जंक किंवा हाय-यील्ड बाँड्स हे कमी क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपन्या किंवा संस्थांद्वारे जारी केलेले फिक्स्ड-इनकम सिक्युरिटीज आहेत. हे क्रेडिट रेटिंग इन्व्हेस्टमेंट ग्रेड बाँड्सपेक्षा डिफॉल्टची जास्त शक्यता दर्शवतं. गुंतवणूकदाराला अतिरिक्त जोखीम भरून काढण्यासाठी जंक बाँड सहसा जास्त उत्पन्न देतात. 'जंक' हा शब्द या बाँड्सची सर्वात कमी क्रेडिट गुणवत्ता दर्शवितो, परंतु याचा अर्थ असा नाही की ते अयोग्य ठरतात.

जंक बाँड्स कसे काम करतात?

जेव्हा एखाद्या कंपनीला बाँड जारी करून भांडवल उभं करायचं असतं, तेव्हा ती इतर प्रकारच्या बाँड्सप्रमाणेच प्रक्रियेतून जाते. कंपनी बाँडच्या अटी ठरवते, ज्यात व्याजदर, मॅच्युरिटीची तारीख आणि परतफेडीच्या अटींचा समावेश आहे. जंक बाँडच्या संभाव्य उच्च परताव्यात स्वारस्य असलेले गुंतवणूकदार हे सिक्युरिटीज खरेदी करतात. जारीकर्ता जंक बाँडच्या विक्रीद्वारे मिळालेल्या निधीचा वापर त्यांचं ऑपरेशन, विस्तार किंवा इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी करतो.

Web Title: donald Trump tariffs affected stock world junk bond sales in full swing in America heading towards recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.