Reciprocal tariff Latest news: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसा टॅरिफ आकारण्याचे निर्णय घेतला. यामुळे जगभरात व्यापार युद्ध छेडले गेले आहे. ट्रम्प यांच्याकडून चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. इतर देशांनाही टॅरिफचा फटका बसू लागला आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार रमेश दमानी यांनी याबद्दल एक मोठं विधान केले आहे. रेसिप्रोकल टॅरिफचा निर्णय मागे घेण्यासाठी अमेरिका मजबूर होईल, असे ते म्हणाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेकडून घेण्यात आलेला रेसिप्रोकल टॅरिफचा निर्णय हा आर्थिक क्रूरता आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरातील गुंतवणूकदारांच्या विश्वास डळमळीत झाला असल्याचे रमेश दमानी म्हणाले.
टॅरिफ अमेरिकेला मागे घेऊ जातोय -दमानी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावर भाष्य करताना रमेश दमानी म्हणाले, "जगभरात काय होतंय हे अनेकदा तुम्ही समजून सांगू शकत नाही. गोंधळ जाता. टॅरिफचा निर्णय अमेरिकेला पुन्हा महान बनवत नाहीये, तर हा निर्णय अमेरिकेला मागे घेऊन जात आहे", असे दमानी म्हणाले.
वाचा >या व्यक्तीला शेअर मार्केट क्रॅशची आधीच माहिती मिळाली? बुडत्या बाजारात कमावले अब्जो रुपये
"जग निमूटपणे हे सहन करणार नाही. नवीन आघाड्या होतील आणि रणनीती तयार केल्या जातील. जर अमेरिकेला पाठीमागे राहायचे असेल, तर ते पाठीमागे पडतील. चीनने दोन देशातील व्यवहारासाठी पर्यायी व्यवस्था विकसित केली आहे. ही अमेरिकेच्या तुलनेत वेगवान आणि स्वस्त आहे. हे याचेच संकेत आहे की, अमेरिकेचे शक्ती कमी होत आहे", असे रमेश दमानी म्हणाले.
ट्रम्प यांना निर्णय मागे घेणं भाग पडेल
"आर्थिक वास्तव स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांना कात्रीत पकडेल. जेव्हा टायटॅनिक बर्फाच्या कड्याला धडकले होते, तेव्हा तो बर्फाचा कडाच टिकला होता. अमेरिका अभेद्य असल्याचे वाटते, पण जनतेचा दबाव, महागाई आणि वॉल स्ट्रीटलवरील आर्थिक घसरण त्यांना या निर्णयाबद्दल माघार घेण्यास भाग पाडेल", असे विश्लेष रमेश दमानी यांनी केले.