Join us

गाफिल राहू नका! कर्मचारी कपातीमध्ये नवा कल; अनेक कंपन्यांकडून ‘छुपी भरती’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 8:53 AM

गार्टनरने सादर केलेल्या अहवालात म्हटले की, २०२२ मध्ये गुगलने मोठ्या प्रमाणात ‘छुपी भरती’ केली. इतरही अनेक कंपन्यांनी हा कल राबवला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या औद्योगिक क्षेत्रात कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू असतानाच ‘छुपी भरती’ हा नवा कलही जोरात असल्याचे समोर आले आहे. यानुसार कंपन्या रिक्त पदांवर कंपनीत कार्यरत लोकांनाच पदोन्नत्या देत असल्याचे आढळून आले आहे.

गार्टनरने सादर केलेल्या अहवालात म्हटले की, २०२२ मध्ये गुगलने मोठ्या प्रमाणात ‘छुपी भरती’ केली. इतरही अनेक कंपन्यांनी हा कल राबवला.कर्मचारी कपात, सामूहिक राजीनामे, गुपचूप नोकरी सोडणे, एकाच वेळी अनेक कंपन्यांत काम करणे, इत्यादी कल आतापर्यंत चर्चेत राहिले आहेत. आता ‘छुपी भरती’ हा कल चर्चेत आला आहे. त्याचा परिणाम नव्याने हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरतीवर दिसून येत आहे.

काय आहे ‘छुपी भरती’?n तांत्रिक सल्ला व संशोधन कंपनी गार्टनरने जारी केलेल्या अहवालानुसार, २०२२ मध्ये ‘छुपी भरती’ कल सुरू झाला होता. यात कंपन्या नवीन गुणवत्ता शोधण्यासाठी नवीन भरती न करता कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नत करतात. यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. n काही विशेष कामासाठी कंपन्या अस्थायी कर्मचाऱ्यांना घेतात. यामुळे कंपन्यांना मंदी असूनही आपले उत्पादनात घटविण्याची गरज भासत नाही तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्याचीही गरज भासत नाही.

ट्विटरने पुन्हा २०० जणांना दिला नारळट्विटरने पुन्हा २०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. त्यामुळे आता एकूण कर्मचारीसंख्या सुमारे १,८०० एवढी झाली आहे. अनेक कर्मचारी त्यांच्या कार्पाेरेट मेल अकाउंटवरून लाॅगआउट झाले. प्राॅडक्ट मॅनेजर्स, डेटा सायंटिस्ट व अभियंते यावेळी प्रभावित झाले आहेत. ट्विटरने अधिग्रहण केलेल्या स्टार्टअपचे प्रमुख किंवा तेथील कर्मचाऱ्यांनाही काढले आहे.

टॅग्स :नोकरी