Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन वर्षात पैसे चौपट? - कोण तो मूर्ख?

दोन वर्षात पैसे चौपट? - कोण तो मूर्ख?

कुणी वाजवीपेक्षा जास्त देतो, असं म्हटलं तर शक्याशक्यतेचा हिशेब मांडून असे दावे तपासून बघायचे असतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:05 AM2022-01-18T05:05:13+5:302022-01-18T05:10:26+5:30

कुणी वाजवीपेक्षा जास्त देतो, असं म्हटलं तर शक्याशक्यतेचा हिशेब मांडून असे दावे तपासून बघायचे असतात. 

dont believe in baseless financial schemes | दोन वर्षात पैसे चौपट? - कोण तो मूर्ख?

दोन वर्षात पैसे चौपट? - कोण तो मूर्ख?

- दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते

समृद्धी, सह्याद्री, धनवर्धिनी किंवा अशाच एखाद्या आकर्षक नावाची कोण कुठली कंपनी गावात अचानक येते. काही दिवसांपूर्वी तिचे नावही कुणाला माहिती नसते. ती कुणी काढली, हे नीटसे ठाऊक नसते. चकचकीत ऑफिस, रंगीत आणि गुळगुळीत पत्रके, मोठमोठी आश्वासने !

 एका योजनेत सुरुवातीला पन्नास हजारांच्या ठेवीवर दरमहा पाच हजार रुपये चेकने दोन वर्षे मिळणार होते. एका वर्षात पन्नास हजारांचे झाले साठ हजार. म्हणजे मूळचे मुद्दल पन्नास हजार आणि त्यावरचे व्याज दहा हजार. वर्षभरात परत मिळणार. दुसऱ्या वर्षाचे साठ हजार निव्वळ नफाच की! दोन वर्षांमध्ये पन्नास हजारांवर सत्तर हजारांचे व्याज मिळण्याचे आमिष. लोक आले नाहीत तरच नवल . सगळा व्यवहार चेकने. ठेवीदारांच्या बरोबर स्टॅम्प पेपरवर करार!  दरमहाच्या पैशांचे पोस्ट डेटेड चेक्स देण्याचे लेखी आश्वासन. पण करार नीट वाचतो कोण? 

- त्यात ठेव ठेवणारा हा ठेवीदार म्हणून  दाखविलेलाच नाही. त्याचा उल्लेख विक्रेता असा! त्याला मिळणारा मोबदला म्हणजे त्याच्या व्यवस्थापन खर्चाची भरपाई दाखविलेली! कंपनी कशाचे उत्पादन किंवा विक्री करते, याबद्दल   पैशाची गुंतवणूक करणाऱ्याला कसलीही माहिती नाही.दरमहा पाच हजारांचे घसघशीत उत्पन्न मिळविण्यासाठी आपण किती रकमेच्या मालाची विक्री केली पाहिजे?  नेमका कोणता व्यवसाय करण्याबद्दल कंपनी आपल्याला हे पैसे देणार आहे, याबद्दलची काहीही माहिती करारात नसते. म्हणजे उद्या जर कंपनीने  व्यवस्थापन खर्चाचा तपशिल मागितला तर ठेवीदार काय दाखवणार? आणि त्याबदल्यात मोबदला कसा मागणार?

- या तथाकथित कंपनीने उद्या आपला शब्द फिरवला तर आपल्याला या कंपनीच्या विरोधात फारसे काही करता येणार नाही. अशा वेळी आपण रडत बसणार. हा सगळा त्रास वाचवणे शक्य असूनही केवळ जास्त उत्पन्नाच्या लोभापोटी लोक खड्ड्यात पडायला तयार होतात. कुणी वाजवीपेक्षा जास्त देतो, असं म्हटलं तर शक्याशक्यतेचा हिशेब मांडून असे दावे तपासून बघायचे असतात. 

हे केलं नाही तर आपले पैसे बुडले हे कळायलाही खूप उशीर झालेला असतो आणि मग हाती काहीच लागत नाही.
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी इमेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

Web Title: dont believe in baseless financial schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.