Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका

कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका

पतधोरण समितीच्या गेल्या दाेन बैठकांनंतर आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले की, गरज भासल्यास व्याजदर वाढविण्यात येतील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 07:48 AM2023-06-24T07:48:38+5:302023-06-24T07:48:57+5:30

पतधोरण समितीच्या गेल्या दाेन बैठकांनंतर आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले की, गरज भासल्यास व्याजदर वाढविण्यात येतील. 

Don't dream of reducing loan installments, RBI's stance | कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका

कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका

नवी दिल्ली : आरबीआयने व्याजदर वाढीला सध्या ब्रेक लावला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये लाेकांची कर्जाचा हप्ता कमी हाेण्याची अपेक्षा वाढली आहे. मात्र, सध्या व्याजदर कमी करण्याचा काेणताही विचार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.
पतधोरण समितीच्या गेल्या दाेन बैठकांनंतर आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले की, गरज भासल्यास व्याजदर वाढविण्यात येतील. 

धाेका टळलेला नाही
महागाई सध्या कमी झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण कायम आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र, मान्सूनचा परिणाम आदींवर भविष्यातील निर्णय अवलंबून राहणार आहे. महागाई वाढल्यास पुन्हा व्याजदरात वाढ केली जाईल.

Web Title: Don't dream of reducing loan installments, RBI's stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.