Lokmat Money > बिझनेस न्यूज > गरिबांना छळू नका, कर्जवसुलीबाबत अर्थमंत्र्यांचे बॅंकांना निर्देश

गरिबांना छळू नका, कर्जवसुलीबाबत अर्थमंत्र्यांचे बॅंकांना निर्देश

कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावणे वा इतर मार्गाने त्रास दिला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:23 AM2023-07-25T05:23:27+5:302023-07-25T05:23:52+5:30

कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावणे वा इतर मार्गाने त्रास दिला जातो.

Don't harass the poor, Finance Minister instructs banks regarding loan recovery | गरिबांना छळू नका, कर्जवसुलीबाबत अर्थमंत्र्यांचे बॅंकांना निर्देश

गरिबांना छळू नका, कर्जवसुलीबाबत अर्थमंत्र्यांचे बॅंकांना निर्देश

नवी दिल्ली : कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावणे वा इतर मार्गाने त्रास दिला जातो. लहान कर्जदारांना हा त्रास जास्त सहन करावा लागताे. मात्र, आता तसे चालणार नाही. लहान कर्जदारांना परतफेडीसाठी छळू नका, असे निर्देश सर्व सरकारी व खासगी बँकांना दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभेत दिली.

या समस्येबाबत हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी प्रश्न विचारला. उत्तरात सीतारामन म्हणाल्या की, सर्वच बँकांनी अशी प्रकरणे संवेदनशीलता राखून माणुसकीच्या भावनेतून साेडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कठाेर मार्गांचा अवलंब करू नये.

कर्जवसुलीबाबत नियम

 वसुली एजंटने ग्राहकाला सकाळी 
८ ते सायं ७ या वेळेतच कॉल करावा. 
 ग्राहकाच्या ठिकाणीच भेटू शकतो. 
एजंटने ओळखपत्र दाखवावे.
ग्राहकांची गोपनीयता पाळावी. 

ग्राहकाचा शारीरिक वा मानसिक छळ करता येत नाही. 
असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो.

Web Title: Don't harass the poor, Finance Minister instructs banks regarding loan recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.