Join us  

नोकरी नको, बिझनेसच लय भारी;भारतात ४७ टक्के लोक व्यवसायाकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 4:20 PM

जगात ३१ टक्के, तर भारतात ४७ टक्के लोक व्यवसायाकडे वळले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढती महागाई आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जगभरातील लोक घर कसे चालवायचे याबाबत चिंतित आहेत. उत्पन्न घटल्यामुळे लोक उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. बाजार संशोधन संस्था ‘इप्सोस’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगभरातील ३१ टक्के लोकांनी व्यवसाय सुरू केला आहे. २९ टक्के लोक आगामी २ वर्षात व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. भारतात ४७ टक्के लोकांनी व्यवसाय सुरू केला असून, ३२ टक्के लोक भविष्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहेत.

कोरोनाने भारतीयांना लढायला शिकविलेगेल्या २ वर्षांपासून भारतीयात व्यवसाय करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. भारतीय लोक जोखीम पत्करण्यास कचरत नाहीत. त्यामुळेच अमेरिकेतील ६६ पेक्षा अधिक युनिकॉर्नचे संस्थापक भारतीय आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेतील एकूण ५५ टक्के युनिकॉर्नचे संस्थापक अनिवासी आहेत. ते बाहेरच्या देशातून अमेरिकेत व्यवसायासाठी आलेले आहेत. अमेरिकेतील युनिकॉर्न संस्थापकात भारतीय मूळ असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

१६% अर्थव्यवस्था१६% माहितीचा अभाव१६%इतर कारणे१३%अधिकव्याज दर ४९% भांडवलाची अनुपलब्धता  

५२% भारतीय भविष्यात व्यवसाय करण्यास उत्सुक

५८% भारतीयांना वाटते की, सरकारी योजनांमुळे व्यवसाय सुरू करण्यात कमी जोखीम 

टॅग्स :व्यवसायखरेदीकोरोना वायरस बातम्या