Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSE-NSE ठप्प करण्याच्या खलिस्तानी धमकीवर दूरसंचार विभाग गंभीर; अर्थ मंत्रालय, सेबीला केली विनंती

BSE-NSE ठप्प करण्याच्या खलिस्तानी धमकीवर दूरसंचार विभाग गंभीर; अर्थ मंत्रालय, सेबीला केली विनंती

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांना लक्ष्य करण्याच्या धोक्याबाबत दूरसंचार विभाग गंभीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:27 PM2024-01-04T16:27:07+5:302024-01-04T16:29:41+5:30

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांना लक्ष्य करण्याच्या धोक्याबाबत दूरसंचार विभाग गंभीर झाले आहे.

dot investigates khalistani threat calls asks finance ministry sebi to ensure cyber security of stock exchanges bse nse | BSE-NSE ठप्प करण्याच्या खलिस्तानी धमकीवर दूरसंचार विभाग गंभीर; अर्थ मंत्रालय, सेबीला केली विनंती

BSE-NSE ठप्प करण्याच्या खलिस्तानी धमकीवर दूरसंचार विभाग गंभीर; अर्थ मंत्रालय, सेबीला केली विनंती

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) बंद पाडण्याची धमकी खलिस्तानीने दिली होती. आता या धोक्याबाबत दूरसंचार विभाग गंभीर झाला आहे, त्यांनी तपास सुरू केला आहे. काही भारतीयांना बीएसई आणि एनएसईला लक्ष्य करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमक्या आल्या होत्या. दूरसंचार विभागाने आतापर्यंत केलेल्या तपासणीत जे आढळले आहे, त्या आधारे दूरसंचार विभागाने वित्त मंत्रालय आणि बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांना विनंती केली आहे.

विभागाने केंद्रीय मंत्रालय आणि सेबीला हे प्रकरण प्राधान्याने घेण्याचे आणि दोन्ही स्टॉक एक्स्चेंजचे सायबर सुरक्षा मानके मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय दूरसंचार विभागाने आंतरराष्ट्रीय लांब अंतराच्या ऑपरेटरना अशा आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

सरकारनं जारी केले जनरल प्रोव्हिडंट फंडाचे व्याजदर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पत्रकारांसह अनेक भारतीय नागरिकांना १ जानेवारीपासून यूकेच्या नोंदणीकृत क्रमांकावरून कॉल आले आहेत. यामध्ये त्यांना १२ मार्चपूर्वी भारतीय स्टॉक सोडून अमेरिकन स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले कारण BSE आणि NSE लिक्विडेट होतील. या कॉल्समध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. १२ मार्च रोजी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांना ३१ वर्षे पूर्ण झाल्यामुळे पन्नूनने शेअर बाजार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. सुमारे ३१ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात बीएसई इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले होते.

हा संदेश रेकॉर्ड करण्यात आला असून तो खलिस्तानी फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नूनचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वापरकर्त्यांव्यतिरिक्त, गृह मंत्रालय आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दल (CERT-In) यांनी दूरसंचार विभागाला अशा घटनांची माहिती दिली होती. जेव्हा DoT ने या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की, हे कॉल्स प्रत्यक्षात बाहेरील देशातून आले होते म्हणजेच ते आंतरराष्ट्रीय कॉल होते.

दूरसंचार सेवा प्रदात्यांना या विशिष्ट आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या सर्व कॉलचे विश्लेषण करण्यास सांगितले होते. यावरून अनेक भारतीयांना या विशिष्ट क्रमांकावरून कॉल आल्याचे समोर आले आहे. यानंतर दूरसंचार विभागाने ऑपरेटरना या क्रमांकावरून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, SEBI आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभाग यांना देखील BSE आणि NSE च्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) च्या सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य पावले उचलण्यास सांगितले आहे.

Web Title: dot investigates khalistani threat calls asks finance ministry sebi to ensure cyber security of stock exchanges bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.