चेन्नई : सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील स्टार्टअप्स कंपन्यांची २0१९ मधील गुंतवणूक दुपटीने वाढून १0८ दशलक्ष डॉलरवर गेली आहे. २0१८ मध्ये ती ५१ दशलक्ष डॉलर होती. करारांची संख्याही सातवरून बारावर गेली आहे. नाइकेने एप्रिलमध्ये १४ दशलक्ष डॉलरचा करार केला. त्यामुळे कंपनीचे भांडवली मूल्य वाढून ७00 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त झाले. मायग्लॅमने बेसमेर व्हेंचरकडून १९ दशलक्ष डॉलर मिळविले. रुटस् व्हेंचर्स व सॉस डॉट व्हीसी यासारख्या छोट्या कंपन्यांनाही चांगली गुंतवणूक मिळाली.भारतात चांगले दिसणे व फॅशन याविषयी जागरूकता वाढत आहे. भारतीय सौंदर्य प्रसाधने व त्वचारक्षक उत्पादने खरेदी करीत आहेत. त्यातून स्टार्टअप कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत.स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक आता वाढत आहे. व्हेंचराचे व्यवस्थापकीय संचालक नटराजन म्हणाले की, आर्थिक मंदीमुळे यशस्वी व्यावसायिक मॉडेलमध्येच गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. नाइकेसारख्या कंपन्यांच्या यशामुळे या क्षेत्रातील चांगला व्यवसाय करणाऱ्या काही कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.>स्वदेशी ब्रँडमध्ये वाढई-कॉमर्सशिवाय सौंदर्य क्षेत्रातही स्वदेशी ब्रँडची संख्या वाढत आहे. ग्रोफर्सचा आॅरेंज समथिंग व महेश भूपती समर्थित सेन्टियल या ब्रँडची त्यात अलीकडेच भर पडली आहे.
सौंदर्य प्रसाधन स्टार्टअप्सच्या गुंतवणुकीत दुप्पट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:38 AM