शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती असतानाच अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असाच एक शेअर गौतम अदानी यांच्या कंपनीचा आहे. अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर वाढ दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. हा शेअर अदानी ग्रुप कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आहे.
गुंतवणूकदारांना केलं मालामाल - अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांत जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या कालावधीत शेअरचा भाव जवळपास 1052 रुपयांवरून 1920 रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 82 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
गेल्या एका वर्षासंदर्भात बोलायचे झाल्यास, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 295 टक्क्यांची तेजी आली आहे. तसेच गेल्या 5 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 5720 टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे.
ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट -अदानी समूह आपल्या ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टवर पुढे चालण्यासाठी 4 अब्ज डॉलर जमवण्याचा प्रयत्न करत आहे. अदानी एंटरप्राइजेसची संपूर्ण मालकी असलेली कंपनी अडानी न्यू इंडस्ट्रीज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्ररीय बँकांच्या माध्यमाने फंड उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर कंपनीची या बँकांसोबत सुरुवातीची चर्चाही सुरू आहे.