Join us  

"डॉ. कलामांचा फोन वाटला होता राँग नंबर", सुधा मूर्ती यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 6:13 AM

सुधा मूर्ती यांनी साेशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना एकदा माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा फोन आला. तेव्हा सुधा मूर्ती यांना वाटले होते की, त्यांना चुकून फोन लागला असावा. सुधा मूर्ती यांनी साेशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. 

त्यांनी म्हटले की, ‘मला ऑपरेटरने सांगितले की, डॉ. कलाम तुमच्याशी बोलू इच्छितात. तेव्हा मी ऑपरेटरला सांगितले की, त्यांना नारायण मूर्ती यांच्याशी बोलायचे असेल.’ नारायण मूर्ती यांनी फोन घेतला आणि मला सांगितले की, त्यांना तुझ्याशीच बोलायचे आहे. तेव्हा डॉ. कलाम यांचा फोन मला कशासाठी आला असेल, या विचाराने मी चिंतित झाले. डॉ. कलाम यांनी मला सांगितले की, ‘आयटी डिव्हाइड’वरील तुमचा कॉलम मला आवडला आहे. मी तुमचे लिखाण नेहमी वाचतो. मला ते आवडते.’

टॅग्स :सुधा मूर्तीएपीजे अब्दुल कलाम