Join us

सुट्टीवर असलेल्या सहकाऱ्याला त्रास दिल्यास 1 लाख रुपयांचा दंड! 'या' कंपनीने बनवला नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 6:24 PM

Dream 11 Guidelines : ड्रीम 11 ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की, जे कर्मचारी रजेवर आहेत. त्यांना कंपनीचा कोणताही कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामादरम्यान (Official Work) त्यांना ईमेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, स्लॅक किंवा कॉलवर त्रास देऊ शकत नाही.

नवी दिल्ली : भारतीय टेक कंपनी फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रीम 11 ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की, जे कर्मचारी रजेवर आहेत. त्यांना कंपनीचा कोणताही कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामादरम्यान (Official Work) त्यांना ईमेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, स्लॅक किंवा कॉलवर त्रास देऊ शकत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने असे केले तर त्याला एक लाख रुपये दंड भरावा लागेल. दरम्यान, कंपनीने हा नियम बनवला आहे, कारण सध्या कर्मचाऱ्यांचे जीवन अनेकदा अत्यंत त्रासदायक बनत चालले आहे. रजेवर असतानाही जेव्हा त्यांना कंपनीकडून महत्त्वाचे कॉल, मेसेज किंवा ईमेल येतात.

एका लिंक्डइन पोस्टमध्ये कंपनीने UNPLUG धोरणाबद्दल लिहिले आहे की, ड्रीम 11 आम्ही 'ड्रीमस्टर' ला लॉग ऑफ करतो, जो अनप्लग्ड आहे, प्रत्येक संभाव्य स्टेडियम कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मपासून दूर आहे, मग तो स्लॅक असो, ईमेल असो आणि अगदी व्हॉट्सअप ग्रुप देखील असो. ड्रीमस्टरच्या वर्क इको सिस्टममधील कोणीही त्यांच्या योग्य सुट्टीवर असताना त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही, याची खात्री करण्यासाठी आम्ही हे करतो. याचबरोबर, ड्रीम 11 ने म्हटले आहे की, प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवणे किंवा सुट्टीवर पूर्णपणे आराम केल्याने एकूण मूड, जीवनाची गुणवत्ता, सर्वसाधारणपणे उत्पादकता आणि बरेच काही सुधारू शकते.

CNBC.com च्या एका रिपोर्टनुसार, ड्रीम 11 चे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी दावा केला आहे की, जर एखादा सहकाऱ्याने 'अनप्लग' वेळेदरम्यान दुसऱ्या इतर कर्मचाऱ्याशी संपर्क साधला तर त्याला किंवा तिला सुमारे 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. बॉसपासून नवशिक्यापर्यंत, दरवर्षी या स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी युनिकॉर्नमधील प्रत्येकजण  एका आठवड्यासाठी कंपनीच्या सिस्टममधून साइन आउट करू शकतो.

याचबरोबर, हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी स्पष्ट केले की, त्यांची कंपनी या दोघांवरही अवलंबून राहू नये यासाठी त्यांनी हे तत्त्व स्वीकारले आहे. ड्रीम 11 लिंक्डइनवर 'ड्रीमस्टर्स'कडून काही प्रशंसापत्रे देखील शेअर करते, जे मुंबईस्थित कंपनीत काम करणारे कर्मचारी आहेत. कर्मचार्‍यांना कंपनीच्या सर्व सिस्टम आणि ग्रुपपासून अलिप्त राहण्याची परवानगी देणे हा सर्वोत्तम लाभ आहे.

15 कोटीहून अधिक युजर्स2008 मध्ये ड्रीम 11 ची सुरूवात झाली. सध्या ड्रीम 11 चे 15 कोटीहून अधिक युजर्स आहेत. 2020 मध्ये ड्रीम 11 हे इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी शीर्षक प्रायोजक बनले.

टॅग्स :व्यवसायकर्मचारी