लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. पण, आता त्यांच्या स्वप्नांचाही चुराडा व्हायला लागला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरांमध्ये माेठी वाढ केल्यामुळे गृहकर्जावरील व्याजदरही वाढले आहे. त्यामुळे लहान घर खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. या घरांची विक्री कमी हाेत असून महाग घरे खरेदी करणाऱ्यांवर मात्र काेणताही परिणाम झालेला नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार सर्व शेड्युल्ड व्यावसायिक बँकांकडून ३० लाख रुपयांपर्यंतच्या नव्या गृहकर्जांचे प्रमाण घटून ४५ टक्क्यांवर आले आहे. जूनच्या तिमाहीत हे प्रमाण ६० टक्के हाेते. कमी उत्पन्न असलेल्या लाेकांवर व्याजदर वाढल्याचा परिणाम झाला आहे. गृहकर्ज महाग झाल्यामुळे या श्रेणीतील घरांची खरेदी घटल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.
२.५० टक्के व्याजदर वाढ मे महिन्यापासून झाली आहे. १.८० लाख काेटी रुपयांचे गृहकर्ज वाटप मे २०२२ ते जानेवारी २०२३१.४० लाख काेटी रुपयांचे गृहकर्ज वाटप मे २०२१ ते जानेवारी २०२२ ८.२ लाख ग्राहकच कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकतात.
घर खरेदी करणाऱ्यांवर असा झाला परिणाम
- १.१५ काेटी एकूण गृहकर्ज ग्राहक- १८.९ लाख काेटी रुपये थकीत कर्जाची एकूण रक्कम- ४८ टक्के ईबीएलआरचे प्रमाण- ५५.२ लाख ईबीएलआरचे ग्राहक- ९.१ लाख काेटी रूपये ईबीएलआर श्रेणीतील कर्जाची थकीत रक्कम- ४७ लाख ग्राहकांनी ईएमआय, कालावधी किंवा दाेन्हींमध्ये केली वाढ- ८.२ लाख रुपये थकीत कर्ज या श्रेणीत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"