Lokmat Money > बिझनेस न्यूज > यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

अधिसूचनेनुसार नोंदणी आवश्यक; सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 07:06 AM2022-01-28T07:06:42+5:302022-01-28T07:07:44+5:30

अधिसूचनेनुसार नोंदणी आवश्यक; सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

Drones will no longer fly without permission, the government will issue drone certificates | यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच ड्रोन सर्टिफिकेशन योजना जाहीर केली असून, यासाठी अधिसूचना काढली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. यानुसार ड्रोन वापरण्यासाठी आता ड्रोनचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. परवानगीशिवाय ड्रोनचा वापर केल्यास कारवाई होऊ शकते.

भारताला जगातील आघाडीची ड्रोन यंत्रणा बनवण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. याद्वारे लाखो ड्रोन संपूर्ण सुरक्षिततेसह भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करू शकतील. यामुळे भारतात भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होईल. ड्रोनचे प्रमाणिकरण सोपे आणि पारदर्शक असेल. तसेच प्रक्रियेला गती मिळेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
सरकारने ड्रोनची नोंदणी आणि ऑपरेशनसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे ड्रोन नियमांच्या सिंगल विंडोद्वारे भारतातील ड्रोन उत्पादन उद्योग वाढण्यास मोठी मदत करणारे ठरतील. 
ड्रोन वापरकर्त्याला आता नोंदणी करावी लागेल. यामध्ये ड्रोनसोबतच त्याचा मालक आणि पायलट यांचीही नोंदणी केली जाणार आहे. कोणत्याही झोनमध्ये ड्रोन उडवायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल.

कुठे कुठे होणार वापर
nवस्तू, औषधांची घरपोच सेवा
nहवामानाविषयी सर्वेक्षण
nमहामार्ग आणि रेल्वेसाठी सर्वेक्षण
nकायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी
nशेतीच्या सर्वेक्षणासाठी
nस्थलाकृतिक सर्वेक्षण
nफोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी

Web Title: Drones will no longer fly without permission, the government will issue drone certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.