लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आॅनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढविण्यात यावे आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथिल करावेत, या मागण्यासाठी उद्या, मंगळवार, ३0 मे रोजी देशभरातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने घेतला आहे. या बंदचा फटका रुग्ण व सर्वसामान्यांना बसणार आहे. देशभरातील नऊ लाख औषध विक्रेते आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे सदस्य आहेत. आमच्या तक्रारी आम्ही अनेकदा सरकारकडे मांडल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आम्ही बंदचा निर्णय घेतला आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. या बंदची पूर्वकल्पना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृहमंत्रालय, तसेच औषध नियंत्रक कक्ष यांना देण्यात आली आहे. सरकार आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, अशी औषध विक्रेत्यांची तक्रार आहे. अनेक औषध विक्रेते ३0 मे रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमून निदर्शनेही करणार आहेत.सुविधा देण्यासाठी खर्च येतोकमिशनमध्ये बऱ्याच काळापासून वाढ करण्यात आलेली नाही. आम्हाला १६ टक्के कमिशनवरच वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. एकीकडे सरकार आम्हाला औषध दुकानांमधील सुविधा वाढवण्यास सांगत आहे. पण त्या सुविधा देण्यासाठी खर्च करावाच लागेल. त्यामुळे कमिशन वाढवून मिळायला हवे, असे आॅर्गनायझेशनचे म्हणणे आहे.
औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 12:58 AM