Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीआधी खूशखबर! बदामाच्या किमती अर्ध्यावर, जाणून घ्या 'ड्रायफ्रूट'चे नवे दर...

दिवाळीआधी खूशखबर! बदामाच्या किमती अर्ध्यावर, जाणून घ्या 'ड्रायफ्रूट'चे नवे दर...

काजू-बदाम असो किंवा मग बेदाणे अन् अक्रोड प्रत्येक प्रकारच्या सुका मेव्याच्या किमतीत मोठी घट  झाली आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार खरंतर दिवाळीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढ होते. पण यावेळी अगदी उलट घडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 02:13 PM2021-10-26T14:13:13+5:302021-10-26T14:14:02+5:30

काजू-बदाम असो किंवा मग बेदाणे अन् अक्रोड प्रत्येक प्रकारच्या सुका मेव्याच्या किमतीत मोठी घट  झाली आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार खरंतर दिवाळीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढ होते. पण यावेळी अगदी उलट घडत आहे.

Dry fruits rate today Wholesale Price Mandi Rate badam ke dam kaju rate today akhrot rate | दिवाळीआधी खूशखबर! बदामाच्या किमती अर्ध्यावर, जाणून घ्या 'ड्रायफ्रूट'चे नवे दर...

दिवाळीआधी खूशखबर! बदामाच्या किमती अर्ध्यावर, जाणून घ्या 'ड्रायफ्रूट'चे नवे दर...

काजू-बदाम असो किंवा मग बेदाणे अन् अक्रोड प्रत्येक प्रकारच्या सुका मेव्याच्या किमतीत मोठी घट  झाली आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार खरंतर दिवाळीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढ होते. पण यावेळी अगदी उलट घडत आहे. बदामाचा दर ११०० रुपये प्रतिकिलोहून थेट ६०० रुपये किलोवर आला आहे. तर काजूच्या दरातही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

देशातील सर्वात मोठी सुका मेवा बाजारपेठ असलेल्या खारी बाओली येथील व्यापारी रवि बत्रा म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे खरंतर सुका मेवाच्या किमतीत अपेक्षेहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळेच आता दर वेगानं घसरत आहेत. येत्या काही काळात नव्या उत्पादनानं किमतीत आणखी दबाव निर्माण होईल. 

सुका मेव्याचे नवे दर
खारी बाओली रोडमधील सुका मेवा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बदामाचे दर ११०० रुपयांवरुन थेट ६८० रुपये किलोवर आले आहेत. तर कॅलिफोर्नियाच्या बदमाची किंमत ११२० रुपये प्रतिकिलोहून घसरुन ६६० रुपये इतकी झाली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील बदामाची किंमत ११४० रुपयांनी घसरुन ६८० रुपये प्रतिकिलो झाली आहे. तर ईराण येथील बदाम राज की किंमतही घसरली आहे. अफगाणिस्तानातून येणारे बदाम ११९० रुपयांहून खाली घसरुन ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. तर काजूचे दर १ हजार रुपयांनी घसरुन ८०० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. अक्रोड १००० रुपयांवरुन ८०० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. 

येत्या काळात आणखी दर घसरणार
व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या कळात सुका मेव्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. भारतात तीन ठिकाणांहून बदाम सर्वाधिक आयात केले जातात. यात अफगाणिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानातून गुरवंती गिरीचे बदाम आयात केले जातात. ज्याची गुणवत्ता चांगली असते आणि तेलाचं प्रमाणही जास्त असल्यानं त्याची महाग असतात. याशिवाय ईराणहून मामरा गिरीचे बादाम येतात. जे अफगाणिस्तानच्या तुलनेत थोडे स्वस्त असतात आणि लवकरच सुकतात. याशिवाय भारतात कॅलिफोर्नियाहूनही बदाम आयात केले जातात. हे बदाम थोडे वेगळे असतात. बदामाच्या देखील काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानुसार त्याचा दर निश्चित केला जातो. 

Web Title: Dry fruits rate today Wholesale Price Mandi Rate badam ke dam kaju rate today akhrot rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.