पुणे, दि. 25 - डीएसके बेनेलीने नवीन स्पोर्ट बाईक बाजारात आणली आहे. DSK Benelli 302R या नवीन स्पोर्ट बाईकचे मंगळवारी लॉन्चिग करण्यात आले. या बाईकमध्ये एबीएस फीचर देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारात Yamaha YZF-R3 आणि Kawasaki Ninja 300 यासारख्या स्पोर्ट बाईक्सना DSK Benelli 302R टक्कर देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . दरम्यान, डीएसके बेनेलीने आधीच DSK Benelli 302R चे बुकींग सुरु केले होते. सध्या या स्पोर्ट बाईकची किंमत शोरुमध्ये 3 लाख 48 हजार रुपये इतकी आहे.
DSK Benelli 302R ही बाईक पूर्णपणे सुपरबाईक असून आम्हाला खात्री आहे की, डीएसके बेनलीच्या इतर बाईक्स प्रमाणे बाजारात या बाईकला सुद्धा यश मिळेल, असे डीएसके मोटोव्हिल्सचे चेअरमन शिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
व्हाईट रोसो, रेड नीरो आणि सिल्वर वर्डे या तीन कलरमध्ये DSK Benelli 302R ही स्पोर्टबाईक उपलब्ध असणार आहे. तसेच, या बाईक्सची विक्री भारतातील डीएसके बेनेलीच्या डीलरशिप्समधून करण्यात येणार आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की, DSK Benelli 302R बाईक रायडिंगसाठी चांगला अनुभव देणारी आहे. या बाईकच्या फ्रंट व्हिलमध्ये यूसएडी फोर्क्स आणि बॅक व्हिलमध्ये मोनो सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच, फ्रंट व्हिलमध्ये डुअल पेटल डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. याचबरोबर 260 एमएम डिस्क ब्रेक अप फ्रंट आणि 240 एमएम रियर डिस्क ब्रेक दिले आहेत.