वॉशिंग्टन : स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे भारतातील ६९ टक्के, तर चीनमधील ७७ टक्के रोजगार धोक्यात आला आहे, असा इशारा जागतिक बँकेच्या एका संशोधनात देण्यात आला आहे. तंत्रज्ञानामुळे विकसनशील देशांतील पारंपरिक आर्थिक मार्ग पायापासून विस्कळीत होऊ शकतो, असेही या संशोधनाच्या अहवालात म्हटले आहे. आफ्रिका खंडातील देशांनाही स्वयंचलित तंत्रज्ञानाचा मोठा फटका बसेल, असे या संशोधनात म्हटले आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष जीम कीम यांनी वॉशिंग्टनमधील ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटमध्ये ‘आत्यंतिक दारिद्र्य’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पायाभूत क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहोत. तथापि, भविष्यात आम्हाला कोणत्या प्रकारच्या पायाभूत सोयींची गरज लागणार आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.’
‘तंत्रज्ञान जगाला मुळापासून बदलून टाकणार आहे, हे आम्ही जाणून घेतले पाहिजे. पारंपरिक मार्गाने कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यापासून ते वस्तू उत्पादन वाढविण्यापर्यंत विविध क्षेत्रात पूर्णांशाने औद्योगिकरण करणे विकसित देशांना शक्य होणार
नाही.’ (वृत्तसंस्था)
स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे ६९ टक्के रोजगारावर गदा
स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे भारतातील ६९ टक्के, तर चीनमधील ७७ टक्के रोजगार धोक्यात आला आहे, असा इशारा जागतिक बँकेच्या एका संशोधनात देण्यात आला आहे
By admin | Published: October 6, 2016 06:01 AM2016-10-06T06:01:58+5:302016-10-06T06:01:58+5:30