Lokmat Money > बिझनेस न्यूज > आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने फटका, आयातदारांना भरावे लागणार डीमरेज

आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने फटका, आयातदारांना भरावे लागणार डीमरेज

कस्टम विभागाने भारतभर बसवलेले आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने गेल्या दोन दिवसांपासून आयात झालेल्या मालाचे व निर्यात होणा-या मालाचे कस्टम क्लीअरन्स थांबले आहे़ त्यामुळे आयात व निर्यातदारांना प्रंचड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे़.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:23 AM2017-08-25T00:23:20+5:302017-08-25T00:23:45+5:30

कस्टम विभागाने भारतभर बसवलेले आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने गेल्या दोन दिवसांपासून आयात झालेल्या मालाचे व निर्यात होणा-या मालाचे कस्टम क्लीअरन्स थांबले आहे़ त्यामुळे आयात व निर्यातदारांना प्रंचड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे़.

Due to the collapse of iGet software, importer needs to pay | आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने फटका, आयातदारांना भरावे लागणार डीमरेज

आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने फटका, आयातदारांना भरावे लागणार डीमरेज

- सोपान पांढरीपांडे ।

पणजी : कस्टम विभागाने भारतभर बसवलेले आइसगेट सॉप्टवेअर कोसळल्याने गेल्या दोन दिवसांपासून आयात झालेल्या मालाचे व निर्यात होणा-या मालाचे कस्टम क्लीअरन्स थांबले आहे़ त्यामुळे आयात व निर्यातदारांना प्रंचड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे़
कस्टम विभागाच्या आइसगेट सॉप्टवेअर सोमवारी सकाळी डेटा ओव्हरबर्डनमुळे बंद पडले. त्यामुळे भारतात बंदरांत आणि ड्रायपोर्टवर ट्रकमधून माल उतरवून घेता आला नाही़ त्यामुळे निर्यातदारांचा नाशिवंत माल खराब झाला, तर आयातदारांना आता मालभाड्याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी उशिरा घेतल्याने डीमरेज भरावे लागणार आहे.
नागपूरच्या कॉनकॉरच्या अजनी इनलॅण्ड कंटेनर डेपोचे कनोजिया यांनी दोन दिवस सॉप्टवेअर बंद असल्याचे व त्यामुळे ट्रक अडकून पडल्याचे मान्य केले़ हजारो ट्रक उभे असल्याची माहिती आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम पोर्ट कंपनीच्या उच्चाधिकाºयांनीही गोपनीयतेच्या अटीवर दिली़ जहाजामधून माल उतरवणे व चढवणे दोन्ही बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य महिंद्र आर्य यांनी आयातदारांना डीमरेजचा भुर्दंड पडणार आहे आणि निर्यातदारांचा नाशिवंत माल खराब झाल्याचे मान्य केले़ कस्टम विभागाच्या चुकीमुळे हे झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली़ नागपूरचे कस्टम व जीएसटीचे प्रधान मुख्य कमिशनर एक़े ़ पांडे सुटीवर असून, त्यांनी याविषयी वक्तव्य करण्यास नकार दिला़

प्रत्यक्ष पडताळणी करून क्लीअरन्स
बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, सेंट्रल बोर्ड आॅफ कस्टम्स अ‍ॅण्ड जीएसटीने बुधवारी संध्याकाळपासून कर्मचा-यांमार्फत कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून आयात व निर्यात मालाचे क्लीअरन्स सुरू करण्यात आले आहे. पण हा दिलासा दोन दिवस उशिरा आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Due to the collapse of iGet software, importer needs to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.