Join us

महागड्या लोखंडामुळे फोर्जिंग उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:50 PM

लोखंड उत्पादक कंपन्या एकत्रित येऊन (कार्टेल) दर तीन महिन्यांनी किमती वाढवतात.

मुंबई : लोखंड उत्पादक कंपन्या एकत्रित येऊन (कार्टेल) दर तीन महिन्यांनी किमती वाढवतात. याचा फटका या कंपन्यांकडून फोर्जिंगसाठी लोखंड खरेदी करणाऱ्या उद्योगांना बसत आहे. यामुळे १२ हजारांहून अधिक रोजगार देणारा फोर्जिंग उद्योग संकटात सापडला आहे.ट्रॅक्टर्स, व्यावसायिक वाहने, तसेच संरक्षण उत्पादनांमध्ये वापरात येणाºया लोखंडावर फोर्जिंगची प्रक्रिया केली जाते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात फोर्जिंग उद्योगांतून ३२ हजार कोटी किमतीचे २५.२४ लाख टन इतके उत्पादन केले. यापैकी १३ हजार २०० कोटींचे उत्पादन राज्यातील १४१ कारखान्यांनी केले. दरवर्षी हे क्षेत्र ४ ते ५ टक्क्यांनी वाढत आहे.असोसिएशन आॅफ इंडियन फोर्जिंग इंडस्ट्रीचे (एआयएफआय) पश्चिम क्षेत्र प्रमुख यश मुनोत म्हणाले की, महाराष्टÑातील हा उद्योग देशात सर्वात मोठा आहे. यातील ८३ टक्के कारखाने सूक्ष्म किंवा लघु श्रेणीतील आहेत. हे छोटे उद्योग लोखंड उत्पादक कंपन्या ठरवून दरवाढ करीत असल्यानेसंकटात येतात. सध्या देशात १४ राज्यांमध्येच हे कारखाने आहेत. या राज्यांपैकी महाराष्टÑातील वीज दर सर्वाधिक आहे. पूर्णपणे विजेवर अवलंबून असलेल्या या उद्योगाला राज्यात फटका बसतो आहे.