नवी दिल्ली : मर्यादित पुरवठा आणि मागणी वाढल्याने दिल्लीतील डाळींच्या घाऊक बाजारात काही निवडक वस्तूंचे भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी तेजीत आले.
उडदाचा भाव ३०० रुपयांची तेजी नोंदवीत ९६०० ते १०७०० रुपयांवर (प्रति क्विंटल) पोहोचला. मूग आणि डाळीचा भावही १०० रुपयांनी वाढत प्रति क्विंटल ७६०० ते ८१०० आणि ८२०० ते ८५०० रुपयांवर (प्रति क्विंटल) गेला.
मठाचा भावही १०० रुपयांनी वाढत प्रति क्विंटल ५६०० ते ५९०० रुपयांवर बंद झाला. तसेच काबुली चणाही प्रति क्विंटल १५० रुपयांनी महागला.
तूरडाळीचा भाव १०१०० ते १०२५० रुपयांवर (प्रति क्विंटल) गेला. हिरव्या वाटाण्याचा भावही तेजीत येत प्रति क्विंटल ३००० ते ३१०० रुपयांवर गेला.
राजधानी दिल्लीतील डाळ बाजारात सोमवारीही मुख्य डाळींच्या भावात ३00 रुपयांची वाढ झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीही डाळी कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
धणे, मिरची कमजोर
वाढलेली आवक आणि कमजोर झालेली मागणी यामुळे ठोक किराणा बाजारात धणे आणि लाल मिरचीचे भाव २00 रुपयांनी घसरले. धने ११,४00 ते १६,४00 रुपये, तर लाल मिरची ९,८00 ते १७,३00 रुपये क्विंटल झाले. अन्य मसाल्यांचे भाव मामुली चढ-उतारानंतर आदल्या दिवशीच्या पातळीवर बंद झाले.
पुरवठ्यात घट झाल्याने डाळींचे भाव पुन्हा तेजीत
मर्यादित पुरवठा आणि मागणी वाढल्याने दिल्लीतील डाळींच्या घाऊक बाजारात काही निवडक वस्तूंचे भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी तेजीत आले.
By admin | Published: September 29, 2015 10:49 PM2015-09-29T22:49:26+5:302015-09-29T22:49:26+5:30