नवी दिल्ली : मालवाहतुकीनंतर प्रवासी आरक्षणाचे प्रमाण घसरल्याने भारतीय रेल्वेच्या चिंतेत भर पडली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल आणि जून २०१५ दरम्यान प्रवासी आरक्षणाचे (बुकिंग) प्रमाण ८ टक्क्यांनी घसरले आहे.
तिकीटरहित प्रवासाचे वाढते प्रमाण आणि रस्त्यांची अवस्था सुधारल्याने प्रवासी वाहनांकडे वळल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात जून महिन्यापर्यंत प्रवाशांचे प्रमाण ८ टक्क्यांनी घटले आहे. प्रवाशांच्या बाबतीत ही नकारत्मक वाढ आहे.
२०१४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत २२३५.६९ दशलक्ष प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. चालू आर्थिक वर्षात याच अवधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २०४२.०४ दशलक्षावर आली. तुलनात्मकदृष्ट्या ८.६६ टक्के घट झाली आहे. प्रवासी कमी होणाचे सर्वाधिक प्रमाण उपनगर क्षेत्रात आहे. एप्रिल ते जून अवधीत उपनगरांतील १०७६.४१ दशलक्ष प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. मागच्या वर्षी याच अवधीत १२२२.६८ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. त्यादृष्टीने प्रवासी संख्येत घट होण्याचे प्रमाण १९.६६ टक्के आहे. रेल्वे प्रवासासाठी आरक्षण करण्याचे प्रमाण घटणे, ही बाब चिंताजनक असून यामागची कारणमीमांसा करून उपाय योजण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेने २४ मे आणि ९ जूनदरम्यान देशभरात तिकीट तपासणीच्या ४,६०० मोहिमा राबविल्या. यात १ लाख ६० हजार फुकटे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून ९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवासी वाहतुकीतून चालू आर्थिक वर्षात ५०,१७५ कोटींची कमाई होईल, असा अंदाज रेल्वेच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेला आहे. तथापि, सद्य:स्थिती बदलली नाही तर हे उद्दिष्ट गाठणे कठीण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मालवाहतुकीची स्थिती चांगली नाही.
पॅसेंजर बुकिंगचे प्रमाण घटल्याने रेल्वेच्या चिंतेत भर
मालवाहतुकीनंतर प्रवासी आरक्षणाचे प्रमाण घसरल्याने भारतीय रेल्वेच्या चिंतेत भर पडली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल आणि जून २०१५ दरम्यान प्रवासी
By admin | Published: July 13, 2015 12:05 AM2015-07-13T00:05:36+5:302015-07-13T00:05:36+5:30