Lokmat Money > बिझनेस न्यूज > वैविध्यामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी भारतापुढे

वैविध्यामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी भारतापुढे

२०२२ पर्यंत कृषी निर्यात दुप्पट करून सध्याच्या ३० लक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ६० लक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे आणि स्थिर व्यापार धोरणाच्या साह्याने पुढील काही वर्षांमध्ये १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:36 AM2020-01-20T06:36:13+5:302020-01-20T06:37:03+5:30

२०२२ पर्यंत कृषी निर्यात दुप्पट करून सध्याच्या ३० लक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ६० लक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे आणि स्थिर व्यापार धोरणाच्या साह्याने पुढील काही वर्षांमध्ये १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे.

Due to diversification, huge export opportunities to India | वैविध्यामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी भारतापुढे

वैविध्यामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी भारतापुढे

भारताचे कृषी निर्यात धोरण :- उद्दिष्टे : २०२२ पर्यंत कृषी निर्यात दुप्पट करून सध्याच्या ३० लक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ६० लक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे आणि स्थिर व्यापार धोरणाच्या साह्याने पुढील काही वर्षांमध्ये १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेणे.
आपली निर्यातीची उत्पादने आणि निर्यातीचे देश यांमध्ये वाढ करून नाशवंत पदार्थांवर भर देऊन उच्च मूल्य आणि मूल्यवर्धित कृषी निर्यात वाढवणे.
नावीन्यपूर्ण, स्वदेशी, सेंद्रिय, पारंपरिक आणि अपारंपरिक कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
बाजारपेठ मिळविण्यासाठी, अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि स्वच्छता आणि फायटोसॅनिटरी (कृषी निर्यातीचे आंतरराष्टÑीय निकष) विषयक समस्या हाताळण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे. लवकरात लवकर जागतिक मूल्यसाखळीशी एकरूप होऊन जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताचा वाटा दुप्पट करण्याचा प्रयत्न करणे. विदेशी बाजारपेठांमधील निर्यात संधींचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे.
कृषी व्यापाराची सद्य:स्थिती
मुख्यत: जागतिक किमतींमध्ये घट झाल्यामुळे गेली पाच वर्षे (२०१३-२०१७) जागतिक कृषी व्यापार तुलनेने घटत चालला आहे. तेलाच्या किमतीत सातत्याने कमी झाल्याने जागतिक कृषी उत्पादनांच्या किमती कमी होण्यास मदत झाली. मात्र तरीही, व्यापाराचे प्रमाण कमी झाले नाही. यावरून जागतिक बाजारपेठेतील मोठी मागणी दिसून येते. जागतिक किमतींमध्ये घट झाल्यामुळे, तसेच २०१४-१५ आणि २०१५-१६ लागोपाठ दुष्काळ पडल्यामुळे भारताची कृषी निर्यातीचा वार्षिक वृद्धीदर - ५% ने कमी होऊन आर्थिक वर्ष २०१३ मधील वर$ ३६ बिलियनवरून झाली आर्थिक वर्ष २०१७ मध्ये वर$ ३६ बिलियन इतकी झाली. मात्र, २०१६-१७ या वर्षामध्ये अपेक्षित उत्पादन झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेची स्थिती नाजूक असूनसुद्धा भारताची कृषी निर्यात लक्षणीयरीत्या वाढली. भारताच्या गेल्या दहा वर्षांच्या कृषी निर्यातीचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, उत्साहवर्धक चित्र दिसून येते. सन २००७ ते २०१६ दरम्यान चीन (८%), ब्राझील (५.४%) आणि अमेरिका (५.१%) यांच्या तुलनेत भारताची कृषी निर्यात ९% नी वाढली. या कालावधीत कॉफी, अन्नधान्ये, बागायती उत्पादनांची निर्यात दुप्पट झाली; तर मांस, मासे, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची निर्यात तीन ते पाचपट वाढली. असे असूनही, लागवडीखालील क्षेत्र हे खूपच कमी असलेल्या थायलंड आणि इंडोनेशिया सारख्या देशांच्या तुलनेत भारताची कृषी निर्यात कमी आहे.
१९७० च्या दशकाचा पूर्वार्ध ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत, भारताचे कृषी क्षेत्राचे वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) सुमारे २५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढले. सन २००० ते २०१४ दरम्यान देशाचे कृषी उत्पादन १०१ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून वाढून ३६७ अब्ज अमेरिकी डॉलरवर गेले. कृषी व कृषीवर आधारित शेतीमध्ये भारताइतके वैविध्य इतर कोणत्याच देशात नाही, त्यामुळेच भारत जागतिक कृषी व्यापारातील अग्रगण्य देश बनू शकतो, अशी आशा आहे.
भारताचे निर्यातयोग्य उत्पादने वैविध्यपूर्ण असून, त्यामध्ये भात
(६ अब्ज अमेरिकन डॉलर्स), सागरी उत्पादने (५.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स) आणि मांस (४ अब्ज अमेरिकन डॉलर्स) यांचा सर्वाधिक म्हणजे ५२% वाटा आहे. वर उल्लेख केलेल्या कृषी उत्पादनांच्या जागतिक व्यापारात भारत आघाडीवर असला, तरी त्याच्या एकूण कृषी निर्यातीचे प्रमाण जागतिक कृषी व्यापाराच्या फक्त २ टक्क्यांहून थोडेसे अधिक म्हणजे अंदाजे १.३७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स एवढे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे देशांतर्गत अन्नसुरक्षा आणि किमती स्थिर ठेवणे हे आहे.
भारताच्या निर्यातीमध्ये प्रामुख्याने कमी मूल्याच्या वस्तूंचा, कच्च्या मालाचा किंवा अर्ध-प्रक्रिया केलेल्या आणि घाऊक वितरण होणाºया वस्तूंचा समावेश असल्याने जागतिक कृषी निर्यातीच्या मूल्य साखळीत भारत खालच्या स्थानावर राहिला आहे. भारताच्या कृषी निर्यातीमध्ये उच्च मूल्याच्या आणि मूल्यवर्धित वस्तूंचे प्रमाण १५% आहे, त्या तुलनेत हे प्रमाण अमेरिकेत २५% आणि चीनमध्ये ४९% आहे. देशामध्ये प्रचंड फलोत्पादन उत्पादन असूनही गुणवत्तेत एकसमानता, मानकीकरण आणि मूल्य साखळीमधील नुकसान यांच्या कमतरतेमुळे भारतातून फळे व भाजीपाल्याची निर्यात मर्यादित आहे.
जागतिक व्यापार, उत्पादन क्षमता, भारताची सध्याची स्पर्धात्मकता, मूल्यवर्धनासाठी वाव आणि भविष्यातील बाजारपेठेची क्षमता या पाच निर्णायक निकषांच्या आधारे प्रत्येक कृषीमालाचा सखोल अभ्यास केला जाईल. शेती, पायाभूत सुविधा व बाजारातील विशिष्ट बाबींसाठी सुमारे दहा कृषीमालाची म्हणून निवड केली जाईल.
प्रारंभिक विश्लेषणानुसार खालील शेतमालामध्ये उच्च निर्यातक्षमता दिसून येते: कोळंबी, मांस, बासमती आणि अन्य तांदूळ, द्राक्षे, केळी, डाळिंब, बटाट्यासह भाज्या, प्रक्रियाकृत / मूल्यवर्धित उत्पादने, काजू, औषधी वनस्पती, हर्बल औषधांसह मूल्यवर्धित स्वरूपात रोपांचे भाग/ हर्बल औषधे, खाद्य-आधारित न्यूट्रास्युटिकल्स, अ‍ॅरोमेटिक्स, मसाले (जिरे, हळद, मिरी), पारंपरिक आणि सेंद्रिय खाद्यपदार्थ.
 

Web Title: Due to diversification, huge export opportunities to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.