Lokmat Money > बिझनेस न्यूज > हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी!

हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी!

सहकारी बँकांचे काही प्रवर्तक बँका कशा बेदरकारपणे चालवतात त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पीएमसी बँकेकडे पाहता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:57 AM2019-09-27T02:57:06+5:302019-09-27T02:57:35+5:30

सहकारी बँकांचे काही प्रवर्तक बँका कशा बेदरकारपणे चालवतात त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पीएमसी बँकेकडे पाहता येईल.

Due to HDIL's loan, PMC Bank was in crisis, exhausted from the Rs 2 crore loan | हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी!

हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी!

- सोपान पांढरीपांडे 

नागपूर : सहकारी बँकांचे काही प्रवर्तक बँका कशा बेदरकारपणे चालवतात त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पीएमसी बँकेकडे पाहता येईल. लोकमतने केलेल्या चौकशीत पीएमसी बँकेने राकेश वधवन यांच्या हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (एचडीआयएल) दिलेल्या कर्जामुळे व त्या कंपनीच्या उपद्व्यापामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

एचडीआयएलकडे विविध बँकांचे २००० कोटी कर्ज थकित आहे. त्यात पीएमसी बँकेचे ४०० कोटी व बँक ऑफ इंडियाचे ५२२ कोटी कर्ज थकित आहे. एचडीआयएलला दिवाळखोर घोषित करावे यासाठी बँक ऑफ इंडियाने नॅशनल कंपनी लॉ ट्रायबुनलच्या मुंबई खंडपीठात सप्टेंबर २०१८ मध्ये अर्ज केला. या अर्जानंतर एचडीआयएल नरमली व तिने बँक ऑफ इंडियाशी तडजोड करून ७ ऑगस्ट २०१९ पर्यंत कर्जफेडीचा करार केला. परंतु एचडीआयएलने तो न पाळल्याने एनसीएलटीने २० ऑगस्ट २०१९ रोजी बँक ऑफ इंडियाच्या दाव्यावर सुनावणी सुरू केली.

यावर एचडीआयएलने बँकेला कर्जाची एकरकमी परतफेड करण्याचा प्रस्ताव दिला व त्यासाठी पीएमसी बँकेने एचडीआयएलचे दुसरे प्रवर्तक सारंग वधवन यांना ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ९६.५० कोटीच्या दोन पे ऑर्डर्स बँक ऑफ इंडियाच्या नावाने दिल्या. त्या बँक ऑफ इंडियाने वटवल्या. याच दरम्यान ३ सप्टेंबर २०१९ रोजी एचडीआयएलच्या प्रवर्तकांनी एनसीएलटीच्या सुनावणीला आव्हान दिले. एनसीएलटीने सुनावणी २६ सप्टेंबर २०१९ पर्यंत स्थगित केली. या प्रकरणात पीएमसी बँकेचे एचडीआयएलकडील ४०० कोटी कर्ज तर वसूल झालेच नाही, पण बँकेवर अधिकचे ९६.५० कोटीसुद्धा गमावण्याची वेळ आली आहे. यामुळेच रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले आहेत.

एचडीआयएलवर मेहेरबानी का?
पीएमसी बँकेने एचडीआयएलवर मेहेरबानी का दाखवली ते उघड झाले आहे. एचडीआयएलकडे पीएमसी बँकेचे १.९० लाख शेअर्स आहेत. शिवाय ड्रीम्स द मॉलचे ९४००० शेअर्स एचडीआयएलकडे आहेत. याच शॉपिंग मॉलमध्ये पीएमसी बँकेचे मुख्यालय आहे. दरम्यान, पीएमसी बँकेची ३६ वी वार्षिक आमसभा शनिवार, २८ सप्टेंबर २०१९ रोजी होणार होती ती संचालक मंडळाने रद्द केली आहे.

Web Title: Due to HDIL's loan, PMC Bank was in crisis, exhausted from the Rs 2 crore loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.