Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिनी वस्तूंच्या आयातीमुळे देशातील असंख्य छोटे आणि मध्यम उद्योग बंद

चिनी वस्तूंच्या आयातीमुळे देशातील असंख्य छोटे आणि मध्यम उद्योग बंद

लाखो बेरोजगार; गुणवत्ता निर्बंधांची संसदीय समितीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:15 AM2018-07-28T01:15:43+5:302018-07-28T01:16:16+5:30

लाखो बेरोजगार; गुणवत्ता निर्बंधांची संसदीय समितीची शिफारस

Due to the imports of Chinese goods, many small and medium enterprises close the country | चिनी वस्तूंच्या आयातीमुळे देशातील असंख्य छोटे आणि मध्यम उद्योग बंद

चिनी वस्तूंच्या आयातीमुळे देशातील असंख्य छोटे आणि मध्यम उद्योग बंद

नवी दिल्ली : चीनमधील स्वस्त आयातीमुळे भारतातील असंख्य सूक्ष्म, छोटे व मध्यम उद्योग बंद पडले असून, लाखो लोक त्यामुळे बरोजगार झाले आहेत. यावर उपाय म्हणून चीनमधून होणाऱ्या आयातीवर गुणवत्ताविषयक बंधने लादण्यात यावीत, तसेच आयात मालाच्या तपासणीची व्यवस्था करण्यात यावी, अशी शिफारस एका संसदीय समितीने केली आहे.
वाणिज्यविषयक संसदीय स्थायी समितीने तयार केलेला एक अहवाल काल संसदेत सादर करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनमधून खेळण्यांपासून कपड्यांपर्यंत तसेच औषधांपासून सायकलीपर्यंत असंख्य वस्तूंची आयात होते. चीनमधून आयात होणाºया वस्तू अत्यंत स्वस्त असतात. त्याचवेळी त्यांचा दर्जाही अत्यंत कनिष्ठ असतो. भारतीय सीमांवरील सुरक्षा व्यवस्था सुमार असल्यामुळे समुद्र आणि जमीन अशा दोन्ही मार्गांनी चीन आपल्या स्वस्त वस्तू भारतात आणून टाकत आहे. याचा परिणाम देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रातील उद्योगांवर होत आहे. यावर ठोस धोरण घेण्याची आता गरज आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाने आपल्या उद्योगांच्या सुरक्षेसाठी याआधीच अत्यंत आक्रमक धोरणे स्वीकारली आहेत. स्वस्त आयात आणि सबसिडी यांच्या विरोधात त्यांनी उपाययोजना केल्या आहेत. इतरही अनेक बंधने लादली आहेत.

सायकल उद्योगही ठप्प
समितीने म्हटले की, चिनी सोलार पॅनलमुळे भारतात दोन लाख लोक बेरोजगार झाले आहेत.
चीनमधून येणाºया स्वस्त सायकलींमुळे भारतीय सायकल उद्योग ठप्प झाला आहे.
चीनमधून होणारी आयात इतकी प्रचंड आहे की, भारत आयातदार देश म्हणूनच प्रसिद्ध होेण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चिनी आयातीमुळे स्थानिक उद्योगांना एक तर आपले उत्पादन कमी करावे लागत आहे; अथवा उद्योगच पूर्णत: बंद करावे लागत आहेत.

Web Title: Due to the imports of Chinese goods, many small and medium enterprises close the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.