Lokmat Money > बिझनेस न्यूज > तापमान वाढल्याने गव्हाचे उत्पादन घटणार

तापमान वाढल्याने गव्हाचे उत्पादन घटणार

देशात सर्वाधिक गहू उत्पादक राज्य बनण्याचे मध्य प्रदेशचे स्वप्न यंदा भंगले आहे. प्रतिकूल हवामान, वाढते तापमान यामुळे चालू रबी हंगामात गेल्या

By admin | Published: January 9, 2016 12:58 AM2016-01-09T00:58:26+5:302016-01-09T00:58:26+5:30

देशात सर्वाधिक गहू उत्पादक राज्य बनण्याचे मध्य प्रदेशचे स्वप्न यंदा भंगले आहे. प्रतिकूल हवामान, वाढते तापमान यामुळे चालू रबी हंगामात गेल्या

Due to the increase in temperature, wheat production will decline | तापमान वाढल्याने गव्हाचे उत्पादन घटणार

तापमान वाढल्याने गव्हाचे उत्पादन घटणार

इंदूर : देशात सर्वाधिक गहू उत्पादक राज्य बनण्याचे मध्य प्रदेशचे स्वप्न यंदा भंगले आहे. प्रतिकूल हवामान, वाढते तापमान यामुळे चालू रबी हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन जवळपास १३ टक्क्यांनी घटून १६0 लाख टन होऊ शकते.
राज्याचे ‘किसान कल्याण आणि कृषी विकास’ विभागाचे संचालक मोहनलाल मीणा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, चालू रबी हंगामात आतापर्यंत जवळपास ५0 लाख हेक्टर जमिनीवर गव्हाची पेरणी झाली.
गेल्या हंगामाच्या तुलनेत हा पेरा १५ टक्क्यांनी कमी आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असूनही तापमान वाढले आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन घटू शकते. त्यामुळे चालू हंगामात आम्हाला १६0 लाख टन उत्पादनापेक्षा जास्त उत्पादनाची अपेक्षा नाही. आता येत्या काही दिवसांत तापमानात घट न झाल्यास आणि पाऊस न पडल्यास गव्हाचे उत्पादन आणखी घटू
शकते.
ज्येष्ठ गहू वैज्ञानिक डॉ. अखिलेशनंदन मिश्र म्हणाले की, गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी कडक थंडीची गरज आहे, पण या भागात चालू रबी हंगामात तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी चणा डाळीची लागवड केली आहे.
परिणामत: गव्हाचा पेरा घटला. ते इंदूरमधील भारतीय कृषी संशोधन केंद्रातील माजी प्रमुख आहेत. ते म्हणाले की, रबीचा पेरा पूर्ण झाल्यानंतरही तापमान वाढत चालल्याने विपरीत परिणाम होत आहे. विशेष करून डिसेंबर हा महिना अपेक्षेपेक्षा जास्त उष्ण राहिला. गहू उगवला, पण त्यात दाणे कमी आहेत. त्यामुळे गव्हाचे उत्पादन घटणार आहे.

Web Title: Due to the increase in temperature, wheat production will decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.