Lokmat Money > बिझनेस न्यूज > डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव

डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव

जळगाव : डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर) मध्ये जळगावाचा समावेश होऊ न शकल्याने औद्योगिकदृष्ट्या जळगाव महानगराचा विकास होऊ शकलेला नाही. याबाबत उदासिनता व राजकीय इच्छाशक्तीचाही मोठा अभाव असल्याची खंत स्थानिक उद्योजक व्यक्त करत असतात.

By admin | Published: February 4, 2016 12:06 AM2016-02-04T00:06:24+5:302016-02-04T00:06:24+5:30

जळगाव : डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर) मध्ये जळगावाचा समावेश होऊ न शकल्याने औद्योगिकदृष्ट्या जळगाव महानगराचा विकास होऊ शकलेला नाही. याबाबत उदासिनता व राजकीय इच्छाशक्तीचाही मोठा अभाव असल्याची खंत स्थानिक उद्योजक व्यक्त करत असतात.

Due to lack of DMIC, backwardness behind Jalgaon: lack of incentives for political will | डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव

डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव

गाव : डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर) मध्ये जळगावाचा समावेश होऊ न शकल्याने औद्योगिकदृष्ट्या जळगाव महानगराचा विकास होऊ शकलेला नाही. याबाबत उदासिनता व राजकीय इच्छाशक्तीचाही मोठा अभाव असल्याची खंत स्थानिक उद्योजक व्यक्त करत असतात.
१९७५ मध्ये जळगावात एमआयडीसीची स्थापना झाली. एक एक करत करत लहान,मोठे मिळून १२५९ उद्योग या क्षेत्रात उभे राहील. अद्यापही जवळपास ५०० उद्योजकांची जागेसाठीची प्रतिक्षायादी एमआयडीसीच्या जळगाव कार्यालयाकडे आहे. सद्य स्थितीत जवळपास सुमारे ६४८.३१ हेक्टर एवढ्या क्षेत्रात एमआयडीसीचा विविध सेक्टरमध्ये विस्तार झाला आहे. यात लघू उद्योगांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एक वेगळा लौकीक
प्लास्टिक प्रक्रिया उद्योग व दालमिलमधील उत्पादने निर्यात क्षेत्रात जळगावचा लौकीक वर्षानुवर्षे टिकवून आहे. जवळपास ६०० उद्योग हे प्लास्टिकपासून निर्मिती होणार्‍या विविध वस्तूंचे उत्पादन घेतात. यात प्रामख्याने पाईप निर्मिती उद्योग व चटई निर्मिती उद्योगाचा समावेश आहे.तसेच ८० च्या जवळपास दाल मिल औद्योगिक क्षेत्रात आहेत. येथे प्रक्रिया झालेली डाळीचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते.
सुविधा असताना विकास नाही
जळगाव आद्योगिक क्षेत्रासाठी अनुकूल बाबींचा विचार करता एमआयडीसी पासून जवळच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आहे. या व्यतिरिक्त पाण्याची मुबलक सुविधाही आहे. एमआयडीसीची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ही तापी नदीवर आहे. (साकेगाव जवळ), रेल्वे मार्ग, विमानतळाची सुविधाही येथे आहे. या सर्व मुबलक व आवश्यक सुविधा असल्याने औद्योगिक क्षेत्र वाढावे अशी स्थानिक रहिवाशांची अपेक्षा नेहमी असते मात्र तसे चित्र गेल्या अनेक वर्षात दिसले नाही.

Web Title: Due to lack of DMIC, backwardness behind Jalgaon: lack of incentives for political will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.