Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुरवठा घटल्याने कांद्यात तेजी

पुरवठा घटल्याने कांद्यात तेजी

जुना साठा संपल्याने आणि यंदा खरिपाच्या नवीन पिकाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट आल्याने कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे

By admin | Published: October 29, 2015 09:32 PM2015-10-29T21:32:50+5:302015-10-29T21:32:50+5:30

जुना साठा संपल्याने आणि यंदा खरिपाच्या नवीन पिकाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट आल्याने कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे

Due to lack of supply, onion on the rise | पुरवठा घटल्याने कांद्यात तेजी

पुरवठा घटल्याने कांद्यात तेजी

नवी दिल्ली : जुना साठा संपल्याने आणि यंदा खरिपाच्या नवीन पिकाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट आल्याने कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा तेजी आली आहे.
नाशिकनजीक असलेल्या लासलगाव येथे आॅगस्टमध्ये कांद्याचे भाव ५७ रुपये किलो या विक्रमी दरावर पोहोचले होते; पण केंद्र सरकारने अनेक उपाय योजल्याने कांद्याचे भाव कमी होण्यास प्रारंभ झाला. १६ आॅक्टोबर रोजी हे भाव २५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले होते.
मात्र, गेल्या आठवड्यापासून कांदा पुन्हा भडकण्यास प्रारंभ झाला आहे. आता कांदा ३० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ)च्या आडेवारीनुसार लासलगावात कांद्याचा भाव ३२ रुपये प्रति किलो झाला आहे. दिल्ली आणि अन्य बाजारपेठांतही कांद्याच्या भावात अशीच तेजी दिसून आली.

Web Title: Due to lack of supply, onion on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.