नवी दिल्ली : ज्वेलरांकडून असलेली मागणी घटल्याने, तसेच जागतिक बाजारातील कमजोर कलामुळे राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात सोमवारी घसरण झाली. २९ महिन्यांच्या उच्चांकावर असलेले सोने ३६0 रुपयांनी उतरून ३0,९८0 रुपये तोळा झाले. चांदी मात्र ३२0 रुपयांनी वाढून ४७,४00 रुपये किलो झाली.दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३६0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,९८0 रुपये आणि ३0,८३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २00 रुपयांनी घसरून २४,१00 रुपये झाला. शनिवारी सोने ५४0 रुपयांनी वाढले होते. दिल्लीत तयार चांदीचा भाव ३२0 रुपयांनी वाढून ४७,४00 रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३७५ रुपयांनी वाढून ४७,८५५ रुपये किलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) >सिंगापूरमध्ये घसरणजागतिक बाजारापैकी प्रमुख बाजार असलेल्या सिंगापूरमध्ये सोने 0.१९ टक्क्यांनी घसरून १,३४७.९0 डॉलर प्रति औंस झाले. जुलै महिन्यात सोने २.२ टक्क्यांनी वाढले, तर या वर्षात आतापर्यंत ते २७ टक्क्यांनी वाढले आहे.
मागणी घटल्याने सोने घसरले, चांदी मात्र तेजीतच
By admin | Published: August 02, 2016 4:57 AM