Join us  

सलग तिसऱ्या महिन्यात वाढली ‘ठोक’ महागाई

By admin | Published: July 15, 2016 2:56 AM

ठोक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात वाढला. खाद्य वस्तू आणि कारखाना उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्याने

नवी दिल्ली : ठोक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात वाढला. खाद्य वस्तू आणि कारखाना उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाईचा हा निर्देशांक १.६२ टक्क्यावर गेला आहे. गुरुवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर झाली. किरकोळ क्षेत्रातील महागाईची आकडेवारी बुधवारीच जाहीर झाली होती. ५.७७ टक्क्यांवर गेलेला किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर आता २२ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. महागाईचे दोन्ही निर्देशांक वाढ दर्शवीत असल्यामुळे ९ आॅगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीची शक्यता मावळली आहे. ठोक क्षेत्रातील महागाईचा वार्षिक दरही जूनमध्ये वाढून 0.७९ टक्क्यावर गेला आहे. मेमध्ये तो उणे (-) २.१३ टक्क्यांवर होता. जून महिन्यात खाद्य क्षेत्रातील महागाई ८.१८ टक्क्यांनी वाढली. फळे, भाजीपाला, अन्नधान्ये तसेच प्रोटिनयुक्त पदार्थ यांच्या दरांत मोठी वाढ झाल्याने या क्षेत्राला निर्देशांक वाढला आहे. भाजीपाल्याचा निर्देशांक १६.९१ टक्क्यांवर गेला आहे. डाळींच्या किमतींमध्ये २६.६१ टक्के, तर बटाट्यांच्या किमती तब्बल ६४.४८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.