Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार

रुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार

रुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 06:21 AM2018-08-18T06:21:23+5:302018-08-18T06:22:54+5:30

रुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे.

Due to rupee depreciation, new headaches will increase in government, import costs will increase | रुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार

रुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार

नवी दिल्ली/मुंबई - रुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे.
भारत हा जगातील एक मोठा आयातदार देश आहे. कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने आणि खाद्यतेल अशा अनेक महत्त्वपूर्ण वस्तूंची आयात भारत करतो. रुपयाची घसरण झाल्यामुळे भारताचे आयात बिल वाढत आहे. मार्च २0१९ ला संपणाऱ्या वित्त वर्षात भारताचे आयात बिल ६00 अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. आदल्या वर्षात ते ५६५ अब्ज डॉलर होते. यंदा रुपयाची तब्बल ९.३ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे महागाईही वाढली आहे. जुलैमधील महागाईचा दर सलग नवव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेला दिलेल्या ४ टक्के उद्दिष्टापेक्षा अधिक राहिला. रुपयाने आता सत्तरी पार केली आहे.
शहरी मध्यमवर्ग भाजपाच्या व्होट बँकेचा मूलाधार आहे. रुपयाच्या घसरणीचा याच मध्यमवर्गास मोठा फटका बसला आहे. जाणकारांच्या मते, मोदी यांना लगेच मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार नाही. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत २0१४च्या विजयाची पुनरावृत्ती त्यांना कठीण जाणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुका होत आहेत, तसेच येत्या चार महिन्यांत भाजपाशासित
तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकादेखील होत आहेत.

मध्यमवर्ग होईल नाराज

आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ संशोधक सतीश मिश्रा यांनी सांगितले की, रुपयाच्या घसरगुंडीला अनेक घटक कारणीभूत आहेत. तथापि, त्याचा परिणाम पंतप्रधान मोदी यांच्या तसेच त्यांच्या सरकारच्या प्रतिमेवर होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जसजशा वाढत जातील तसतसा मध्यमवर्ग नाराज होत जाईल. मध्यमवर्ग हा मत बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

Web Title: Due to rupee depreciation, new headaches will increase in government, import costs will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.