नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयाने चीनला मोठा दणका बसला आहे. भारतात इअरबड्स, नेक बँड आणि स्मार्टवॉच यांसारख्या विअरेबल वस्तूंचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. भारतीय ब्रँड्सनी देशातील 75% विअरेबल मार्केटवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यामुळे चीनमधील कारखान्यांच्या ऑर्डरवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी देशात एकापाठोपाठ एक अनेक कारखाने बंद होत आहेत.
भारतामध्ये गेल्या वर्षात जवळपास 8,000 कोटी रुपयांच्या विअरेबल वस्तूंची निर्मिती झाली. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा एक मोठा निर्णय. सरकारने पूर्णपणे तयार विअरेबल वस्तूंच्या इम्पोर्टवर 20 टक्के बेसिक कस्टम ड्यूटी लावली होती. यामुळे कंपन्यांनी प्रोडक्ट चीनमधून आयात करण्याऐवजी ते देशातच तयार करायला सुरुवात केली. आज भारत जगभरातील विअरेबल्स मार्केटचा सर्वात मोठा बाजार म्हणून समोर आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, बोट (Boat) आणि गिझमोर (Gizmore) सारखे ब्रँड्स बहुतेक विअरेबल वस्तू देशातच तयार करत आहेत. या कंपन्यांनी ठोक्याने वस्तू तयार करणारी कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज (Dixon Technologies) आणि ऑप्टीमस इलेक्ट्रॉनिक्स (Optiemus Electronics) सोबत हात मिळवणी केली आहे.
यासंदर्भात बोलताना, नोएडातील Gizmore कंपनीचे चीफ एक्झिक्यूटिव्ह संजय कलीरोना म्हणाले, विअरेबल्स असेंबलिंग चीनमधून भारतात शिफ्ट झाली आहे. यामुळे चिनी असेंबलिंग कंपन्यांकडे कुठलेही काम उरलेले नाही. यापूर्वी आम्ही तेथून पूर्णपणे तयार युनिट्स (Completely Build-up Units) आयात करत होतो. मात्र, सरकारने विअरेबल्सवर ड्यूटी लावल्यापासून आम्ही ते सेमी नॉक-डाऊन फॉर्ममध्ये मागवतो आणि येथे त्याची असेंबलिंग केली जाते. यामुळेच भारताला सप्लाय करणाऱ्या कंपन्यांकडे आता कुठल्याही प्रकारच्या ऑर्डर नाही.
सरकारचा निर्मय -
बोटचे चीफ एक्झिक्यूटिव्ह समीर मेहता म्हणाले, 75 टक्के ऑडियो प्रॉडक्ट्स आणइ 95 टक्के स्मार्टवॉच देशातच तयार होत आहेत. गेल्या वर्षापूर्वी हा आकडा 20 ते 25 टक्केच होता. मेहता म्हणाले, भारतामध्ये गेल्या दीज वर्षात विअरेबल्सचा खप सर्वाधिक आहे. यामुळे कंपन्यांनी आपले मॅन्यूफॅक्चरिंग भारतातच शिफ्ट केले आहे. यामुळे चिनी कंपन्यांकडे काम राहिलेले नाही. तसेच काही बंदही झाल्या आहेत.