Join us  

उत्पादक-विक्रेत्यांनाच फुटला घाम, ग्राहकांनी फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 8:25 AM

भर उन्हाळ्यात सततचा अवकाळी पाउस आणि गारपीटीमुळे मे महिन्यातही ऊन तापलेले नाही.

नवी दिल्ली : भर उन्हाळ्यात सततचा अवकाळी पाउस आणि गारपीटीमुळे मे महिन्यातही ऊन तापलेले नाही. त्यामुळे एसी, कुलर आणि फ्रीज विक्रेत्यांना घाम फुटला आहे. या उत्पादनांची विक्री सुमारे १५ टक्क्यांनी घटली आहे.

विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले, की उन्हाळा तापलेला नाही. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात लाेकांनी एसी खरेदी टाळली आहे. हे दाेन महिने या कंपन्यांसाठी सर्वाधिक व्यवसायाचे असतात. मात्र, याच काळात पावसाने त्यांच्या व्यवसायावर विरजण टाकले आहे.

बिघडले गणित, तरीही मागणी वाढण्याची अपेक्षा

देशाच्या अनेक भागांत अवकाळी पावसामुळे अपेक्षित उष्णता निर्माण झाली नाही तरीही एसी, कूलर आणि रेफ्रिजरेटर उद्योगास यंदा १५ ते २० टक्के वाढीची अपेक्षा आहे. यंदा मे- जून व अन्य महिन्यांत चांगली विक्री होऊन आकडा भरून निघेल, असे या उद्योगाचे मत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा ‘अल निनो’चा प्रभाव राहणार असल्यामुळे कमी पाऊस पडेल. परिणामी यंदा उन्हाळ्याचा हंगाम दीर्घ राहील. त्यामुळे उष्णता वाढून एसी व कूलरच्या विक्रीचा आकडा भरून निघेल.

मागील २ महिन्यांत विक्री कमी राहिली. मात्र, पुढे ते वाढण्याची शक्यता आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टॅग्स :व्यवसाय