Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहकांचा डिजिटल व्यवहार वाढल्याने पाकीट अन् खातेही रिकामे

ग्राहकांचा डिजिटल व्यवहार वाढल्याने पाकीट अन् खातेही रिकामे

Banking: डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांचे पाकीट आणि अकाउंटही साफ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:36 PM2023-09-15T13:36:16+5:302023-09-15T13:36:32+5:30

Banking: डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांचे पाकीट आणि अकाउंटही साफ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

Due to the increase in digital transactions of customers, wallets and accounts are also empty | ग्राहकांचा डिजिटल व्यवहार वाढल्याने पाकीट अन् खातेही रिकामे

ग्राहकांचा डिजिटल व्यवहार वाढल्याने पाकीट अन् खातेही रिकामे

मुंबई : हाती रोख देण्यापेक्षा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे अनेकांना सुरक्षित आणि सुलभ वाटू लागले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये स्मार्टपणा आला अन् डिजिटल व्यवहार वाढले. मात्र, डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांचे पाकीट आणि अकाउंटही साफ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

भारतात आर्थिक वर्ष २०२३ मध्ये डिजिटल व्यवहार हे १३.२४ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षभरात ८९.५ मिलियन डिजिटल व्यवहार भारतात झाले आहेत.

खर्चाची मानसिकता वाढली
कुणाच्याही हाती रोख पैसे असले की, ते खर्च करताना अनेक विचार असतात.  मात्र, डिजिटल शॉपिंग मॉल किंवा फूड बाजारात खरेदी करताना डिजिटल व्यवहारात अधिकचा खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

डिजिटल व्यवहारात ग्राहकाला प्रलोभन दाखवणे मार्केटिंगचा एक भाग झाला आहे. वेगवेगळ्या प्रलोभनांना डिजिटल ग्राहक सहज मोहात पडतो. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त व्यवहार तो करतो.
- सुलभा देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई.

पैसे काढण्याचे प्रमाण  घटले तरी एटीएम वाढले 
डिजिटल व्यवहारात वाढ होत आहे. बँकेत जाऊन पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले. तरी शहरात जागोजागी एटीएम दिसून येतात. कोठे ना कुठे तरी दररोज नवीन एटीएम मशीन आल्याचे दिसून येते.

बँकेत येणे कमी झाले
पूर्वीसारखे बँकेत पैसे काढणे  आणि भरण्यासाठी लागणाऱ्या  रांगा कमी झाल्या आहेत.  डिजिटल व्यवहारामुळे लोक  कमी येतात. मात्र, पासबुक 
अपडेट करण्यासाठी  रांगच रांग असते.

Web Title: Due to the increase in digital transactions of customers, wallets and accounts are also empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.