Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावध पवित्र्यामुळे बाजारात पडझड

सावध पवित्र्यामुळे बाजारात पडझड

नव्यानेच लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कराबाबत गुंतवणुकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किंमती,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2017 12:58 AM2017-06-26T00:58:53+5:302017-06-26T00:58:53+5:30

नव्यानेच लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कराबाबत गुंतवणुकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किंमती,

Due to vigilance, market collapses | सावध पवित्र्यामुळे बाजारात पडझड

सावध पवित्र्यामुळे बाजारात पडझड

नव्यानेच लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कराबाबत गुंतवणुकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किंमती, जगभरातील शेअर बाजारांवर असलेले मंदीचे मळभ यामुळे भारतातील गुंतवणुकदारांनीही सावध पवित्रा घेतल्याने बाजारात पडझड झालेली दिसून आली. सप्ताहाच्या प्रारंभी जोमाने वाढणाऱ्या निर्देशांकांना नंतर विक्रीचा फटका बसला. तरीदेखील संवेदनशील निर्देशांकामध्ये वाढ झाली तर निफ्टी किरकोळ घसरणीने बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ जोरदार झाला. जीएसटी रिटर्नबाबत मिळालेल्या सवलती व रिझर्व्ह बॅँकेने अनुत्पादक मालमत्तांबाबत घेतलेले कडक धोरण यामुळे बाजारात वाढ झाली. संवेदनशील निर्देशांकाने ३१५२२.८७ अशी नवीन उच्चांकी भरारी घेतली. नंतर मात्र विक्रीचा जोर वाढल्याने बाजार खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक मागील बंद निर्देशांकापेक्षा ८१.८१ अंशांनी वाढून ३११३८.२१ अंशांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मात्र सप्ताहाच्या अखेरीस खाली येऊन बंद झाला. तो १३.१० अंशांनी घसरून ९५७४.८४ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घट झाली. पुढील महिन्याच्या प्रारंभी लागू होणाऱ्या विक्री व सेवा कराबाबत गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे धोरण स्वीकारून काही प्रमाणात नफा कमविण्याचा प्रयत्न केला. परकीय वित्तसंस्थांनी मात्र २२३.८२ कोटी रुपयांची खरेदी केली.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिजतेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. पिंपाला ४३ डॉलरच्या खाली मूल्य गेले. गेल्या १८ महिन्यांमधील हा नीचांक आहे. त्याचबरोबर मागणीही वाढत नसल्याने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका तसेच युरोपच्या शेअर बाजारांमध्येही फारशी काही उलाढाल झालेली दिसून आली नाही. परिणामी आशियातील बाजारही मंदीत राहिले.

Web Title: Due to vigilance, market collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.