Join us

सोन्यातील गुंतवणूक देईल छप्परफाड रिटर्न्स; पाच वर्षात मिळेल १५ टक्के परतावा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 4:24 PM

कोरोना काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार नोंदविण्यात आले.

मुंबई : गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीने मोठा परतावा दिला असतानाच आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्राहकदेखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार नोंदविण्यात आले. मात्र याच काळात सोन्याने अनेकांना दिलासा दिला. कारण सोन्याचे भाव सतत वाढत असताना अनेकांनी सोन्यात केलेली गुंतवणूक घेतली आहे. रिटर्नमध्ये त्यामुळे अनेकांना परतावादेखील उत्तम मिळाला आहे आणि आता सोन्याचे भाव प्रतितोळा साठ हजार रुपये झाले असून, यात गुंतवणूक केली तर भविष्यात १५ टक्के रिटर्न मिळतील, असा अंदाज सराफ बाजाराने व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने त्यांचे व्याजदर वाढवले आहेत; त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न आहेत. ४ जूनपर्यंत ७० लाख लग्न आहेत. त्यामुळे तीन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. त्यामुळे सोन्यामध्ये तेजी कायम राहील. पुढील काही दिवसांत सोन्याचे तोळा होते. दर १ हजार रुपयाने कमी होतील. मात्र भाव पुन्हा वाढतील. आज सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी पंधरा टक्के जास्त रिटर्न मिळतील. येणाऱ्या काळात सोन्याचा भाव कदाचित तोळा ६५ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स

कारणे काय आहेत?

  • सोन्यात तेजी येईल.
  • मंदी येणार नाही.
  • कोरोना यामागचे एक कारण आहे.
  • डॉलरचे मूल्य वर-खाली होत आहे.
  • रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे.
  • रुपया घसरतोय.
टॅग्स :सोनंव्यवसाय