Join us  

सणासुदीच्या काळात सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 4:01 PM

एक जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा ऑक्टोबर २०२३ मध्ये जीएसटी कलेक्शन सर्वात जास्त झाले आहे.

एक जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा ऑक्टोबर २०२३ मध्ये जीएसटी कलेक्शन सर्वात जास्त झाले आहे. ऑक्टोबर महिना हा सणांचा असतो. दरम्यान, या काळात जीएसटीत विक्रमी वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये होते. १ जुलै २०१७ रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मधील GST संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत GST संकलनात १३ टक्के वाढ झाली आहे.

मुंबईत ११ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; १ कोटींहून अधिक किंमतीच्या घरांची जबरदस्त विक्री

अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२३ साठी जीएसटी संकलन डेटा जारी केला आहे, त्यानुसार ऑक्टोबरमध्ये १,७२,००३ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपये CGST, ३८,१७१ कोटी रुपये SGST, ९१,३१५ कोटी रुपये IGST आणि १२,४५६ कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत.

वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरासरी GST संकलन १.६६ लाख कोटी रुपये आहे, जे ११ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन १३ टक्के अधिक आहे. देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलात १३ टक्के वाढ झाली आहे.

सरकारने CGST मध्ये ४२,८७३ कोटी रुपये तर IGST मध्ये ३६,६१४ कोटी रुपये SGST म्हणून सेटल केले आहेत. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला CGST मधून ७२,९३४ कोटी रुपये, तर राज्यांना ७४,७८५ कोटी रुपये SGST मधून मिळाले.

टॅग्स :जीएसटीसरकारनिर्मला सीतारामन