लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. आजही सोन्याचा भावात तेजी दिसत आहे. आज MCX वर सोन्याचा भाव 61,500 च्याही पुढेगेला आहे. सोन्याच्या भावात लवकरच आणखी तेजी बघायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याच बरोबर चांदीचा भावही वाढला आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्याही पुढे गेला आहे. जागतिक बँकिंग सेक्टरमधील चिंतेच्या वातावरणामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
किती महागलं सोनं-चांदी? -
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी वधारून 61,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदी 0.16 टक्क्यांनी वाढून 78,161 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवला -
जागतिक बाजारपेठेसंदर्भात बोलायचे झाल्यास, जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदी दोन्ही धातू महागले आहेत. कोमॅक्सवर, सोन्याचा भाव प्रति औंस 2058 डलर आणि चांदीचा भाव 26.31 डॉलर प्रति औंस झाला आहे. याचबरोबर फेड रिझर्व्हनेही व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे, त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
68,000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचा भाव -
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 25 बेसिस प्वाइंट्सच्या वाढीबरोबरच अमेरिकेतील व्याजदर 16 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. पुढील आर्थिक वर्षापर्यंत सोन्याचा भाव 66,000-68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. तर पुढील दोन महिन्यांत सोन्याचा भाव 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचलेला दिसेल.
लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट -
जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.