मुंबई : घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आगामी सणासुदीच्या कालावधीमध्ये स्वस्तात घर मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन बँक्स ऑक्शन्स माॅर्टगेज्ड प्राॅपर्टीज इन्फाॅर्मेशनने मालमत्तांच्या लिलावाची माहिती दिली आहे. त्यातून स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लिलाव ८ ऑक्टाेबरपासून सुरू हाेणार आहे.
गृहकर्ज न फेडल्याने जप्त करण्यात आलेल्या घरांचा लिलाव करण्यात येताे. त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. घरे, तसेच व्यावसायिक, औद्याेगिक आणि कृषी मालमत्तांचाही या लिलावात समावेश आहे. बँक ऑफ बडाेदातर्फे या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी बाेलीदारांना ऑनलाइन नाेंदणी करणे आवश्यक असून, केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच लिलावात बाेली लावता येईल.
लिलावातून थकबाकीची वसुली
कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या मालमत्ता बँका ताब्यात घेतात. अशा मालमत्तांचा संबंधित बँकेकडून लिलाव करण्यात येताे. त्यातून बँका थकबाकी वसूल करतात.