Lokmat Money > बिझनेस न्यूज > दसरा-दिवाळीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज

दसरा-दिवाळीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज

आगामी काळातील दसरा-दिवाळी या सणासुदीच्या कालावधीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज झाल्या असून यंदाच्या कालावधीत गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने विक्री करतानाच

By admin | Published: September 21, 2015 11:09 PM2015-09-21T23:09:25+5:302015-09-21T23:09:25+5:30

आगामी काळातील दसरा-दिवाळी या सणासुदीच्या कालावधीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज झाल्या असून यंदाच्या कालावधीत गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने विक्री करतानाच

Dussehra-e-commerce companies ready for Diwali | दसरा-दिवाळीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज

दसरा-दिवाळीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज

मुंबई : आगामी काळातील दसरा-दिवाळी या सणासुदीच्या कालावधीसाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज झाल्या असून यंदाच्या कालावधीत गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने विक्री करतानाच ४० हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा मानस या कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
कॉम्प्युटरसोबतच टॅब्लेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ई-कॉमर्स व्यवहार सुलभ झाल्याने आणि त्याचसोबत यावरील वित्तीय व्यवहारांतही विश्वासार्हता आल्यामुळे यावरील व्यवहार वाढीस लागले आहेत आणि प्रत्येक महिन्यागणिक विक्रीचे नवनवे उच्चांक गाठताना दिसत
आहेत.
याच अनुषंगाने सणासुदीच्या निमित्ताने बाजारात होणाऱ्या उलाढालीचा अभ्यास या कंपन्यांनी केला असून त्यांच्या मते, यंदा कपडे, परफ्युम्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आप्तेष्टांना द्यायचे दिवाळी गिफ्टस् यांच्याकरिता ग्राहकांची पसंती ही आॅनलाईन खरेदीला असेल. त्या अनुषंगाने ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या सूट योजनांची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. ई-कॉमर्स व्यवहारांचे विश्लेषक विवेक मिश्रा यांच्या मते, देशात इंटरनेट, ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहाराची सुरक्षा आणि त्यावरून मिळणारी घसघशीत सूट यामुळे हे व्यवहार वाढीस लागत आहेत.
यंदाच्या दसरा आणि दिवाळीमध्ये देशातील प्रमुख ४० शहरांतून सुमारे ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.
याच तुलनेत याच ४० शहरांतून ई-कॉमर्सवरून होणारी उलाढाल ४० हजार कोटी रुपयांना स्पर्श करील असा अंदाज आहे, तर वर्षभराचा विचार केला तर २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ई-कॉमर्सवरून होणाऱ्या एकूण उलाढालीतही किमान अडीच पट वाढ नोंदली जाईल व हा आकडा ८० हजार कोटी रुपयांच्या घरात जाताना दिसेल. अलीकडील काळात मोबाईलच्या प्रसाराबरोबर ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय वाढला आहे.

एखाद्या मॉलमधील अथवा एखाद्या ठिकाणी दुकान सुरू करून विक्री करण्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत ई-कॉमर्स कंपन्यांची गुंतवणूक किमान ४० टक्के कमी असल्याने त्यांना ग्राहकांना घसघशीत सूट देणे परवडते.
त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या कंपन्यांकडे ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर वळला असल्यामुळे यंदाच्या सणासुदीची उलाढाल मोठी अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ई-कॉमर्सवरील ग्राहकांच्या संख्येतही तिप्पट वाढ झाली आहे. ही ग्राहक संख्या आता सहा कोटींवर पोहोचली आहे.
ई-कॉमर्स व्यवहार वाढण्याची कारणे
तंत्रज्ञानात आलेली सुरक्षितता
पेमेंट बँकांमुळे प्रीपेड पद्धतीने पैसे देण्याची मुभा
कॅश आॅन डिलिव्हरी, अर्थात खरेदीचा माल हाती पोहोचल्यावर पैसे देणे.
सामान्य दुकानातील खरेदीच्या उत्पादनावर तुलनेत किमान ३० ते ४० टक्के सूट.त्यामुळे आॅनलाईन खरेदीला प्राधान्य मिळत आहे.
एवढ्या मोठ्या ग्राहकसंख्येला जर सणासुदीच्या काळात या कंपन्यांनी किमान ३० ते ४० टक्के सूट दिली तर त्या ग्राहक आणि कंपन्या या दोघांनाही मोठा फायदा होताना दिसेल.
(प्रतिनिधी)

Web Title: Dussehra-e-commerce companies ready for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.