चेन्नई : खाण व खनिज निर्यात क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून गुरुवारी प्राप्तिकर विभागाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील १०० ठिकाणी धाडी टाकल्या.
प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, किमान चार व्यावसायिक समूहांच्या विरुद्ध ही कारवाई झाली आहे. तामिळनाडूतील चेन्नई, कोइम्बतूर, तिरुनेलवेली, तुतीकोरीन व कराईकाल येथे तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व श्रीकाकुलम येथे कारवाई झाली आहे. कारवाई झालेल्या संस्थांची नावे आयकर विभागाने गोपनीय ठेवली आहेत. त्यात तामिळनाडूच्या व्ही. व्ही. मिनरल्सचा समावेश असल्याची माहिती आहे. सूत्रांनी सांगितले की, चौपाट्यांवर वाळू उत्खनन व निर्यातीतून मिळणारा बेकायदेशीर पैसा कंपन्यांकडून स्पिनिंग मिल, साखर कारखाने, हॉटेल्स, अभियांत्रिकी कॉलेज व काही नील धातू व्यवसायात (ब्लू मेटल बिझनेस) गुंतविण्यात येत होता. (वृत्तसंस्था)
>मदतीला पोलीसही
या कारवाईत १३० पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले आहेत. सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. चौपाट्यांवरील वाळूचे बेकायदेशीररीत्या उत्खनन, प्रक्रिया आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.
खाण, निर्यात कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याच्या धाडी
खाण व खनिज निर्यात क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून गुरुवारी प्राप्तिकर विभागाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील १०० ठिकाणी धाडी टाकल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:20 AM2018-10-26T03:20:31+5:302018-10-26T03:20:41+5:30